*⚡मालवण ता.२१-:* मालवण बांगीवाडा येथील सावित्री मेडिकल येथे जखमी अवस्थेत सापडलेल्या कबुतरावर मालवणातील पक्षीप्रेमी उदय रोगे यांनी प्राथमिक उपचार करत जीवदान दिले आहे. कबुतराच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्याला सोडून देण्यात येणार आहे. सावित्री मेडिकल येथे जखमी अवस्थेतील कबुतर सापडून आले.
याबाबत पक्षीप्रेमी उदय रोगे यांना माहिती देण्यात आली. रोगे यांनी मेडिकलच्या ठिकाणी दाखल होत कबुतराला ताब्यात घेऊन त्याच्यावर औषधोपचार केले. कबुतराला उडता येत नसल्याने या कबुतराला तीन चार दिवस निरीक्षणाखाली ठेवल्यावर ते उडण्या योग्य झाल्यावर त्याला सोडण्यात येणार आहे असे उदय रोगे यांनी सांगितले. उदय रोगे यांनी आजपर्यंत चिमणी, कोकिळा, कावळा, बुलबुल, कबुतरे, घार, पोपट अशाप्रकारच्या अनेक पक्ष्यांना जीवदान दिले असून हे कबुतर त्यांच्यासाठी ५०० वा पक्षी ठरला आहे.
