एस. एम्. हायस्कूल व विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली येथे पोलिसाची नेमणूक करावी

कणकवली शहर राष्ट्रवादी युवकच्यावतीने मागणी

*⚡कणकवली ता.२१-:* एस् . एम् . हायस्कूल कणकवली येथील अंडरपास येथे ट्रॅफीक हवालदार नेमणूक करण्यात यावी तसेच विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली कॉलेज रोड येथे पोलीस नेमणूक करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक कणकवली शहराध्यक्ष संदेश मयेकर यांनी कणकवली पोलिस स्टेशन येथे केली आहे.

कणकवली पोलीस स्टेशन येथे राष्ट्रवादी युवक कणकवली शहर अध्यक्ष संतोष मयेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सागर वारंग, निखिल गोवेकर ,सतीश जाधव ,नयन गावडे, अजय जाधव यांनी निवेदन सादर केले. या निवेदनात ते म्हणतात,कणकवली येथील एस् . एम् . हायस्कूल समोर अंडरपास येथे वाहनांची वर्दळ कायम असते .

तसेच अल्पवयीन विनापरवानाधारक मुले व रोडरोमिओचा वावर असतो . ही मुले येथील अंडरपासमध्ये थांबून दंगा मस्ती करत असतात . याचा त्रास सर्वसामान्य नागरिक व मुली यांना होत आहे . तरी याची तात्काळ दखल घ्यावी , जेणेकरुन समाज विघातक वृत्तीला आळा बसेल . तरी या मागणीनुसार लवकरात लवकर तेथे ट्रॅफीक पोलीस नेमणूक करावी त्याचप्रमाणे विद्यामंदिर हायस्कूल कणकवली कॉलेज रोड येथे पोलीस नेमणूक करण्यात यावा .कणकवली येथील विद्यामंदीर व कॉलेज सुटण्याच्या वेळी अल्पवयीन विनापरवानाधारक मुले व रोडरोमिओचा वावर असतो व विनाकारण येथे घोळका करून थांबून दंगा – मस्ती करत असतात . याचा त्रास सर्वसामान्य नागरिक व मुली तसेच लहान मुलांना सहन करावा लागतो , तरी याची तात्काळ दखल घ्यावी , तरी या मागणीनुसार लवकरात लवकर तेथे पोलीस नेमणूक करावी ,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शहर युवक कडून करत असल्याचे म्हटले आहे.

You cannot copy content of this page