शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळमध्ये भीक मागा आंदोलन…
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आवाज उठविण्यासाठी करण्यात आले आंदोलन. *⚡कुडाळ ता.२९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यामधील रस्ते अशी स्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. या खड्डेमय रस्त्यावरून जनता जीव मुठीत धरून प्रवास करत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवास करताना लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आवाज उठविण्यासाठी आज शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ-वेंगुर्ला…
