उपविभागीय कृषी अधिकारी ए जी अडसूळे यांची उपस्थिती
वेंगुर्ले -: जलयुक्त शिवार योजनेतून सन २०१७-१८ मध्ये महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने आडेली येथे बांधलेल्या वळण बधा-याचे जलपुजन सोमेश्वर बचतगट आडेली यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.हे जलपुजन उपविभागीय कृषि अधिकारी, सावंतवाडी ए.जी.अडसुळे यांच्या हस्ते पाण्यात फुले वाहुन करण्यात आले.
यावेळी वेंगुर्ले तालुका कृषि अधिकारी हर्षा गुंड, कृषि पर्यवेक्षक विजय घोंगे, क्षेत्रिय सल्लागार (आत्मा) धनंजय गोलम, कृषि सहाय्यक लाडु जाधव, सोमेश्वर बचतगट अध्यक्ष प्रशांत धर्णे, ऍड. सामंत, सामाजिक कार्यकर्ते सचिन दाभोलकर, गुरुनाथ दाभोलकर, शिवा धर्णे, सुभाष मोहिते, बाबाजी शिवलकर, बागलकर , शिवा धर्णे, प्रगतशिल शेतकरी सुरेश धणे, अरुण धर्णे, सत्यवान दाभोलकर, नारायण आगलावे व बचतगटातील शेतकरी सदस्य उपस्थित होते.
सदर बंधा-यामुळे रब्बी व उन्हाळी हंगामातील कडधान्य, भाजीपाला, भुईमुग पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असुन गावातील भुजलपातळीमध्ये सुद्धा चांगली वाढ झाल्याने शेतक-यांनी कृषि विभागाचे आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमावेळी उपविभागीय कृषि अधिकारी सावंतवाडी ए.जी.अडसुळे यांनी कृषि योजनांची सविस्तर माहिती शेतक-यांना दिली. तसेच प्रत्येकाने योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.यावेळी गावातील बचतगटांमार्फत केलेली सामुहिक शेती पाहणी करुन समाधान व्यक्त केले.
