ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बैठक व्यवस्थेचा शुभारंभ

*⚡कणकवली ता.१८-:* ओसरगाव तलाव येथे सामाजिक कार्यकर्ते तथा ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यटकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली. त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्ह्यातील प्रसिद्ध वकील उमेश सावंत विलास परब यांच्यासह वाय जी राणे, जगन्नाथ मोडक, सुनील साटम व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

निसर्गरम्य ओसरगाव तलाव पर्यटकांना आकर्षित करत असते पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन बसण्यासाठी कणकवलीतील दानशूर देणगीदारांनी बबली राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यटकांच्या सेवेत बैठक व्यवस्था प्रदान केली ओसरगाव ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व कौतुक व्यक्त केले

You cannot copy content of this page