स्वराज्य संघटनेने केला विशेष सत्कार
सावंतवाडी ता.१८-: शिष्यवृत्ती परीक्षेत कुमार पारस दळवी यांनी महाराष्ट्र राज्यात अकरावा तर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे त्याच्या या यशाबद्दल सावंतवाडी स्वराज्य संघटनेचे कार्याध्यक्ष अमोल साटेलकर, ज्येष्ठ वकील बापू गव्हाणकर, एल. एस निचम यांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
यावेळी आरपीडी महाविद्यालयाचे प्रा. शैलेश नाईक, प्रा. सतीश बागवे , आरपीडी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक इतर शिक्षकवर्ग आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ वकील बापू गव्हाणकर यांनी रोख रक्कम, इम्पोर्टेड पेनांचा संच व स्पर्धा परीक्षा करिता स्पर्धापुस्तकांचा संच पारस दळवी याला भेट दिला स्पर्धापरीक्षा करिता लागेल ते सहकार्य आपण करू अशी ग्वाही विद्यार्थ्याला देऊन पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
