*⚡कणकवली ता.१८-:* शिवसेना व भाजपकडून प्रतिष्ठेच्या केलेल्या कणकवली तालुक्यातील तरंदळे ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार अर्पिता घाडी यांचा भाजपाचे संदेश सावंत यांनी एका मताने पराभव केला. उपसरपंच संदेश सावंत यांना ५ तर शिवसेनेच्या अर्पिता घाडी यांना ४ मते मिळाली. संदेश सावंत यांना आनंद डोईफोडे, विवेक परब, सीताराम इखाळे, संजना राणे त्यांचे स्वतःचे एक अशी पाच मते मिळाली.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या निवडणूकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली होती. निवडणूक प्रतिष्ठेची करून देखील शिवसेनेला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, संदीप सावंत, स्वप्नील चिंदरकर, भाई आंबेलकर, नगरसेवक शिशिर परुळेकर, राजेश फाटक,सत्यवान राणे, सुधीर सावंत, प्रशांत राणे, बबन डोईफोडे, माजी सरपंच जयसिंग नाईक आदी उपस्थित होते.
