Headlines

Global Maharashtra Breaking News

रायगड पाटबंधारे विभाग चे कार्यकारी अभियंता श्री राकेश धाकतोडे यांना मातृशोक

सावंतवाडी ता.२८-: जलसंपदा विभागाच्या रायगड पाटबंधारे विभाग चे कार्यकारी अभियंता श्री राकेश धाकतोडे  यांच्या मातोश्री सुशीला र धाकतोडे वय ७४ रा.पुणे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे, त्यांच्या पश्चात राजेश व राकेश असे दोन मुलगे,मुलगी सौ.संगीता,जावई संदेश धुवाळी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Read More

मालवण तालुकास्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन

मालवण ता.२८-:* मालवण स्पोटर्स असोसिएशन तर्फे भंडारी ए. सो. हायस्कूल मालवणचे माजी शिक्षक स्व. लिलाधर चव्हाण यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मंगळवार दि. २२ फेब्रुवारी रोजी मालवण तालुकास्तरीय शालेय, माध्यमिक, महाविद्यालयीन व खुला गटामध्ये ऑनलाईन पद्धतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गट प्रथम पहिली ते चौथी साठी माझी शाळा, माझा आवडता प्राणी, गट दुसरा…

Read More

वरची देवली येथे रांगोळ्यामधून साकारला प्रजासत्ताक दिन

मालवण ता.२८-:* देवली गावातील मुली व महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ऊर्जा महिला मंडळ, वरची देवली यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनी गावपातळीवर रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रांगोळीसाठी देशभक्ती, प्रजासत्ताक दिन, राष्ट्रीय एकात्मता या मध्यवर्ती संकल्पना देण्यात आल्या होत्या. या स्पर्धेला महिला व मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रांगोळ्यांमधून प्रजासत्ताक दिन साजरा केला. या स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी दिलेल्या…

Read More

मॉल व स्टॉलमध्ये वाईन विक्रीची निर्णय कोकणासाठी अन्यायकारक

कोकणातील फळांपासून वाईन निर्मितीकडे सरकारचे दुर्लक्ष :परशुराम उपरकर कणकवली ता.२८- राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत राज्यभरातील मॉलमध्ये, विविध स्टॉलमध्ये वाईन विक्रीची परवानगी देण्यात आली. मात्र या आधीच्या सरकारांनी जसा कोकणावर अन्याय केला तसाच या सरकारनेही केला आहे.राष्ट्रवादी पक्षाला झुकते माप देण्याचा प्रयत्न आघाडी सरकार करत आहे .असा आरोप मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी केला.सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

Read More

नवीन कुर्ली वसाहतीमधील कामांना कोट्यावधीचा निधी मंजूर

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा पाठपुरावा; महिन्याभरात कामांना प्रत्यक्षात सुरुवात कणकवली ता.२८-: गेली अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा करत असलेली नवीन कुर्ली वसाहतीतील सुमारे १ कोटी ४६ लाख रुपयांची विकासकामे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून मंजुर करण्यात आली आहेत. तर देवधर प्रकल्पातर्गत २ कोटी ५० लाख, ५० हजारचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी…

Read More

बाल संशोधक जय संतोष भाट याने हरकूळबुदुक येथे केले ध्वजारोहण

कणकवली ता.२८-: महाराष्ट्र राज्यातील चार बाल संशोधकामध्ये निवड झालेल्या हरकूळबुदुक गावातील गुणवंत विद्यार्थी जय संतोष भाट या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वज फडकवुन प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक येथे झेंडा वंदन कार्यक्रम पार पडला. जय संतोष भाट हा हरकुळ बुद्रुक गावचा सुपुत्र असुन तो सध्या कणकवली महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. देशातील 60 बालसंशोधकामध्ये महाराष्ट्र राज्यातील चार बाल संशोधनाची…

Read More

आ नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

ओरोस ता २८ आ नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. जिल्हा न्यायालयात आर बी रोटे यांच्या न्यायालयात ही सुनावणी घेण्यात आली. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर आ नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर…

Read More

तळवडे व्यापारी संघ अध्यक्षपदी दत्तप्रसाद वराडकर बिनविरोध…

सावंतवाडी ता.२८-: तळवडे व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी तळवडे बाजारपेठेतील युवा व्यापारी दत्तप्रसाद उर्फ बंटी वराडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी संदीप सदाशिव पेडणेकर . सचिवपदी समीर रामचंद्र परब खजिनदारपदी सनम कृष्णा कासार यांची निवड करण्यात आली . तसेच या कार्यकारणी सहसचिव पदी रामचंद्र दत्ताराम कुडाळकरसहखजिनदार शिवप्रसाद परब यांची निवड करण्यात आली, तसेच या कार्यकारिणीच्या…

Read More

सोनुर्ली पाक्याचीवाडी येथे आढळली बेवारस स्विफ्ट कार…

ग्रामपंचायत सदस्य संतोष ओटवणेकर यांनी पोलिस स्थानकात दिली खबर… सावंतवाडी ता.२८-: सोनुर्ली पाक्याचीवाडी येथे गेल्या चार दिवसापासून लाल रंगाची स्विफ्ट कार बेवारस स्थितीत उभी आहे, सदर कार मुंबई पासिंगची असून यासंदर्भात सावंतवाडी पोलिसांचे लक्ष वेधण्यात आले आहे. सोनुर्ली पाक्याचीवाडी येथे मंगळवारी धार्मिक कार्यक्रम होता. यावेळी ही कार कोणीतरी पार्क करुन ठेवली, आतमध्ये लेडीज स्कार्फ असून…

Read More

आ नितेश राणे शरण

जिल्हा न्यायालयात झाले दाखल जामिनासाठी केला अर्ज ओरोस ता २८ शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्या नंतर आज भाजप आ नितेश राणे हे आज जिल्हा न्यायालयात स्वतः हजर झाले आहे. सर्वोच्य न्यायालयाने १० दिवसांत शरणागती पत्करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आ राणें यांनी जिल्हा न्यायालयात दाखल होत शरणागती पत्करली आहे….

Read More
You cannot copy content of this page