मालवण ता.२८-:* मालवण स्पोटर्स असोसिएशन तर्फे भंडारी ए. सो. हायस्कूल मालवणचे माजी शिक्षक स्व. लिलाधर चव्हाण यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मंगळवार दि. २२ फेब्रुवारी रोजी मालवण तालुकास्तरीय शालेय, माध्यमिक, महाविद्यालयीन व खुला गटामध्ये ऑनलाईन पद्धतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये गट प्रथम पहिली ते चौथी साठी माझी शाळा, माझा आवडता प्राणी, गट दुसरा पाचवी ते दहावी साठी ऑनलाईन शिक्षण- फायदे व तोटे, भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, गट तिसरा अकरावी ते १५ वी साठी शिक्षण ऑफलाईन की ऑनलाईन, अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याने आम्हास काय दिले ? गट चौथा- खुला गटासाठी ऑनलाईन शिक्षणाचे येत्या पिढीवर होणारे दीर्घकालीन परिणाम, अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याची बेरीज व वजाबाकी असे विषय देण्यात आले आहेत. एका विषयावर निबंध मराठीतून स्वहस्ताक्षरात लिहून त्याचा फोटो व्हॉट्सअप क्रमांक ९४०३५५७३५६ यावर १२ फेब्रुवारी पर्यंत पाठवावा. प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना व उत्तेजनार्थ क्रमांकाना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विजयी स्पर्धकांना दि. २२ फेब्रुवारी रोजी विशेष कार्यक्रमात समारंभपूर्वक पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ मागाहून कळविण्यात येईल. तरी मालवण तालुक्यातील शैक्षणिक संस्थेमधील विद्यार्थी विद्यार्थीना तसेच खुला गटातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मालवण स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.
