वरची देवली येथे रांगोळ्यामधून साकारला प्रजासत्ताक दिन

मालवण ता.२८-:* देवली गावातील मुली व महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ऊर्जा महिला मंडळ, वरची देवली यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनी गावपातळीवर रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रांगोळीसाठी देशभक्ती, प्रजासत्ताक दिन, राष्ट्रीय एकात्मता या मध्यवर्ती संकल्पना देण्यात आल्या होत्या. या स्पर्धेला महिला व मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रांगोळ्यांमधून प्रजासत्ताक दिन साजरा केला. या स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी दिलेल्या संकल्पनेवर आधारित अभिनव रांगोळ्या साकारल्या. या स्पर्धेत एकूण २२ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत पहिला गट- पहिली ते पाचवी मध्ये प्रथम- श्रेया श्रीधर चव्हाण, द्वितीय- रिया संदीप देवलकर, तृतीय – राशी सत्यवान चव्हाण यांना मिळाला. दुसरा गट- सहावी ते दहावी मध्ये प्रथम- गौरी प्रशांत चव्हाण, द्वितीय- दुर्वा तुषार चव्हाण, तृतीय- प्राजक्ता सत्यवान सावंत, तिसरा गट- खुला गट मध्ये प्रथम- प्रतीक्षा एकनाथ चव्हाण, द्वितीय – तन्वी तुषार चव्हाण, तृतीय- सेजल शंकर चव्हाण यांनी यश मिळविले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ ८ मार्च रोजी महिला दिनाच्या दिवशी संपन्न होणार आहे.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मालवण येथील ब्लींक कम्प्युटर्स संचालक स्वाती पारकर आणि जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल च्या गौरी कुमामेकर यांनी काम पाहिले. देवली सरपंच गायत्री चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देवून परीक्षकांचे स्वागत केले. ऊर्जा मंडळाच्या संचालक डॉ. सुमेधा नाईक, मधुरा गोवेकर, तन्वी मांजरेकर, भारती चव्हाण, ज्योती चव्हाण व वेदिका नाईक, तसेच सर्व सदस्यांनी या स्पर्धेचे नियोजन केले. सरपंच गायत्री चव्हाण यांनी सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच गावामध्ये विविध अभिनव उपक्रम सुरू केल्याबद्दल ऊर्जा महिला मंडळाचे कौतुक करत यापुढे देखील गावातील सर्व महिलांनी अशा उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. या स्पर्धेसाठी देवली येथील नरेश चव्हाण यांनी जागा उपलब्ध करून दिली आणि सर्व सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सुमेधा नाईक यांनी केले. यावेळी ऊर्जा महिला मंडळाच्या सदस्या आणि गावातील महिला सहभागी झाल्या होत्या.

You cannot copy content of this page