कणकवली ता.२८-: महाराष्ट्र राज्यातील चार बाल संशोधकामध्ये निवड झालेल्या हरकूळबुदुक गावातील गुणवंत विद्यार्थी जय संतोष भाट या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वज फडकवुन प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक येथे झेंडा वंदन कार्यक्रम पार पडला. जय संतोष भाट हा हरकुळ बुद्रुक गावचा सुपुत्र असुन तो सध्या कणकवली महाविद्यालयीन विद्यार्थी आहे.
देशातील 60 बालसंशोधकामध्ये महाराष्ट्र राज्यातील चार बाल संशोधनाची निवड झाली त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हातील एकमेव हरकूळबुदुक गावातील बालसंशोधकाची निवड झालेली आहे. 7 सप्टेंबर 2021 मध्ये इन्स्पायरच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात 60 टाॅप माॅडेलची निवड करण्यात आली यामध्ये महाराष्ट्र राज्यातील चार विद्यार्थी माॅडेल्सची उत्कृष्ट माॅडेल्स म्हणून निवड करण्यात आली. त्यामध्ये हरकूळबुदुक गवाच्या गुणवंत विद्यार्थीच्या निवड झाली. अशा विद्यार्थीच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयसमोर झेंडा फडकविण्यात आला. गेली तीन वर्ष 26 जानेवारी रोजी गावातील जेष्ठ,कर्तृत्ववान.गुणवंत विद्यार्थी/नागरिकांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात येतो.
तसेच रत्नागिरी येथे महिला पोलीस म्हणून निवड झालेल्या संपदा ठाकुर याचाही सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला त्यावेळी हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच श्रीम. गौसिया बुलंद पटेल माजी उपसभापती बुलंद राजअहमद पटेल, राजू पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य, आसिफ पटेल ,ग्रामविकास अधिकारी संजय सुर्यकांत कवटकर , पोलीस पाटील.संतोष तांबे ,ल.गो.सामंत विद्यालय चेअरमन रमाकांत तेली , माजी चेअरमन ओमप्रकाश ताम्हाणेकर , आरोग्य कर्मचारी, कृषी सहाय्यक, प्राथमिक शाळा हरकुळ बुद्रुक शिक्षक- विद्यार्थी, पोस्ट ऑफिस कर्मचारी, आशा सेविका , अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी , कोतवाल तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
