सोनुर्ली पाक्याचीवाडी येथे आढळली बेवारस स्विफ्ट कार…

ग्रामपंचायत सदस्य संतोष ओटवणेकर यांनी पोलिस स्थानकात दिली खबर…

सावंतवाडी ता.२८-: सोनुर्ली पाक्याचीवाडी येथे गेल्या चार दिवसापासून लाल रंगाची स्विफ्ट कार बेवारस स्थितीत उभी आहे, सदर कार मुंबई पासिंगची असून यासंदर्भात सावंतवाडी पोलिसांचे लक्ष वेधण्यात आले आहे. सोनुर्ली पाक्याचीवाडी येथे मंगळवारी धार्मिक कार्यक्रम होता.

यावेळी ही कार कोणीतरी पार्क करुन ठेवली, आतमध्ये लेडीज स्कार्फ असून लाल रंगाची ही कार एम एच 02 पासिंगची आहे, सदरची कार चार दिवस उलटले तरी कोणीच घेऊन न गेल्याने ग्रापंचायत सदस्य संतोष ओटवणेकर यांना यासंदर्भात संशय आल्याने त्यांनी पोलिसांचे लक्ष वेधले. जर कार बंद पडली असती तर चार दिवसात कोणी तरी त्या ठिकाणी फिरकला असता मात्र कोणीच न आल्याने सावंतवाडी पोलिस ठाण्याचे बीट अंमलदार श्री लोहकरे यांना कल्पना देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page