Global Maharashtra Breaking News

वेंगुर्लेतील सर्व वयोगटातील महिलांसाठी हस्तकौशल्याचे मोफत प्रशिक्षण…

⚡वेंगुर्ले ता.०१-: भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले व महिला मोर्चा च्या वतीने सर्व वयोगटातील महिलांसाठी हस्तकौशल्याचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण शिबीर भाजपा युवा नेते विशाल परब यांनी पुरस्कृत केले असून सोमवार ३ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत दुपारी ३ ते ६ वेळात साईमंगल कार्यालय , वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये…

Read More

मालवण वीज कार्यालयातील बिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याची पालकमंत्र्यांकडून सूचना…

बाबा मोंडकर यांची माहिती:भाजपा मालवणच्या वतीने वेधले लक्ष.. ⚡मालवण ता.०१-:वीज महावितरण कंपनीच्या मालवण कार्यालयात सुरु असलेले वीज बील भरणा केंद्र कॅशिअर अभावी बंद करण्याच्या निर्णयामुळे वीज ग्राहकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. ही बाब भाजप मालवण कडून पालकमंत्री नितेश राणे यांच्या कानी घातल्यानंतर मालवण वीज कार्यालया तील वीज बील भरणा केंद्र सुरु ठेवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना…

Read More

युवासेना मालवण शहर संघटकपदी ऋषिकेश सामंत यांची नियुक्ती…

⚡मालवण ता.०१-:शिवसेनेच्या युवासेना मालवण शहर संघटक पदी ऋषिकेश दत्तप्रसाद सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी ही नियुक्ती केली. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र ऋषिकेश सामंत यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर, शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर,…

Read More

गवाणकर व कदम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मालवणात ५ रोजी शोकसभा…

⚡मालवण ता.०१-:ज्येष्ठ नाटककार, मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर ओळख निर्माण करून देणारे, ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर व ज्येष्ठ दिग्दर्शक रघुनाथ कदम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अष्टपैलू कलानिकेतन, मालवणतर्फे दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. गंगाराम गवाणकर तथा नाना व रघुनाथ कदम यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीची…

Read More

वायरी भूतनाथ येथे ५ रोजी रंगभूमी दिन…

⚡मालवण ता.०१-:वायरी भूतनाथ येथील भूतनाथ नूतन नाट्य समाज या नाट्य मंडळातर्फे श्री. प्रदीप वेंगुर्लेकर यांच्या निवासस्थानी मराठी रंगभूमी दिन सोहळा दि. ५ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सायंकाळी ७ वाजता नटराज मूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे. तरी नाट्यप्रेमींनी उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

कोळंब येथील गोपाळकृष्ण मंदिरात १७ रोजी गवळदेव उत्सव…

⚡मालवण ता.०१-:कोळंब भटवाडी येथील गोपाळकृष्ण मंदिरात गवळदेव उत्सव आणि आठवा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सोमवार दि. १७ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वाजता मूर्ती पूजा व अभिषेक, ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ वाजता महाआरती, १ वाजता महाप्रसाद व तीर्थप्रसाद, ३ वाजता श्री चरणी ग्रामस्थांची गाऱ्हाणी,…

Read More

आचरा पिरावाडी येथील ज्येष्ठ नाट्य कलावंत जीजी सारंग यांचे निधन…

⚡मालवण ता.०१-:आचरा पिरावाडी येथील रहिवाशी व ज्येष्ठ नाट्य कलावंत श्री. काशिनाथ उर्फ जीजी अनाजी सारंग (वय ७८) यांचे आज शनिवारी पिरावाडीतील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. जीजी सारंग यांनी नाट्य, कला व गायन क्षेत्रात बहुमोल असे योगदान दिले. पिरावाडीमधील हौशी रंगभूमीवरील व सांस्कृतिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडीचे…

Read More

कोकणात पावसाने शेतकऱ्यांचं घामाचं सोनं वाहून नेलं..

बबन साळगावकर:शासनाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी व कर्जमाफी करावी.. ⚡सावंतवाडी, ता.१-:उसवलं गणगोत सारं — आधार कुणाचा नाही, अशी वेळ कोकणातील शेतकऱ्यांवर आली आहे. अवकाळी आणि सतत पडत असलेल्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.शासनाने या परिस्थितीची तातडीने दखल घ्यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी आणि त्यांच्या कर्जाची माफी करावी, अशी मागणी शेतकरी…

Read More

डेगवे-तांबोळी मार्गावरील फॉरेस्ट रस्ता झाला खड्डेमय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास…

⚡बांदा ता.०१-: डेगवे–तांबोळी मार्गावर वन खात्याच्या मालकीतील रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. अवघ्या 280 मीटर अंतराच्या या फॉरेस्ट रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने तांबोळी, असनीये, घारपी, फूकेरी, झोळंबे, भालावल, कोनशी, नांगरतास, दाभील या गावातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.हा रस्ता विद्यार्थ्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी सर्वात…

Read More

बांद्यात १५ नोव्हेंबरला नट वाचनालयात बालवाचक कथाकथन स्पर्धा…

⚡बांदा ता.०१-: शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून येथील नट वाचनालयाच्या वतीने विष्णु गावकर, आडाळी पुरस्कृत (त्यांची पत्नी कै. सौ. विजयालक्ष्मी विष्णु गांवकर व सुपुत्र कै. श्री. बिपीन विष्णु गांवकर यांचे स्मरणार्थ) बालवाचक कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा शनिवार दिनांक १५ नाव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नट वाचनालय, बांदा च्या नाडकर्णी सभागृहात…

Read More
You cannot copy content of this page