नगराध्यक्षांना अँड. निता सावंत कविटकर यांचा थेट इशारा: आमच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर दिलीच पाहिजे..
⚡सावंतवाडी ता.२४-: नगरपालिकेच्या आयोजित कौन्सिल बैठकीत विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शब्दयुद्ध पाहायला मिळाले. विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना नगराध्यक्षांकडून समाधानकारक व समर्पक उत्तरे दिली जात नसल्याचा आरोप करत शिंदे शिवसेना नगरसेविका अँड. नीता सावंत यांनी नगराध्यक्षांना थेट इशारा दिला.
यावेळी बोलताना सावंत म्हणाल्या की, “विरोधी पक्षाने विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देता येत नाहीत, आणि त्याऐवजी आम्हाला मोठ्या आवाजात बोलू नका असे सांगितले जाते. हा प्रकार म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे का?” असा सवाल नगरसेविका सौ. कवीटकर त्यांनी उपस्थित केला.
तसेच त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करू नये. आमचा आवाज मोठा आहे आणि तो ऐकण्याची तयारी ठेवावी,” असा इशाराही त्यांनी दिला.या वक्तव्यामुळे बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
