Headlines

Global Maharashtra Breaking News

महिला सेलने राबवलेला मेळावा म्हणजे महिलांसाठी पर्वणी : वर्षाताई केनवडे

प्राथमिक शिक्षक समिती , कणकवलीच्या महिला आघाडीचा उपक्रम कणकवली ता.०१-:* कणकवली तालुका शाखेचे शैक्षणिक , सामाजिक उपक्रम नेहमीच उल्लेखनीय असतात. महिला सेलने राबवलेला मेळावा म्हणजे महिलांसाठी पर्वणी असून एक अभूतपूर्व सोहळा पाहण्याचे भाग्य सर्व महिलांना लाभले असे आनंदोद्गार राज्याच्या महिला अध्यक्षा वर्षाताई केनवडे यांनी मराठा मंडळ कणकवली येथे बोलताना काढले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती…

Read More

शांतादुर्गा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

मालवण ता.०१-:* मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान कविता सादर केल्या तसेच विज्ञानावर आधारित भाषणे केली. तर यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध विज्ञान प्रतिकृतीनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाची सुरुवात ‘डोळे उघडून बघा गड्यानो झापड लावू नका’ या विज्ञान गीताने झाली. ‘प्रश्न…

Read More

कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेसाठी कणकवली ते कुणकेश्वर मार्गावर मोफत लक्झरी बससेवा

आ. नितेश राणे यांच्या मार्फत उपक्रम कणकवली ता.०१-:* आ. नितेश राणे यांच्या मार्फत कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेसाठी कणकवली ते कुणकेश्वर मार्गावर मोफत लक्झरी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या बस सेवेचा शुभारंभ करताना जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते नगराध्यक्ष समीर नलावडे, उपसभापती मिलिंद मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शहर अध्यक्ष अण्णा कोदे,…

Read More

कणकवली कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वागदे येथे बांधले वनराई बंधारे

कणकवली ता.०१-:* कणकवली कॉलेज कणकवली राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचेमार्फत दत्तक गाव वागदे तालुका कणकवली याठिकाणी नुकतेच विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान जलसंधारण, ग्रामस्वच्छता व श्रमदान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जलसंधारणातून जल सुरक्षिततेकडे या उपक्रमांतर्गत वागदे ग्रामपंचायत हद्दी मध्ये गावठाणवाडी, दंगलवाडी, ग्रामपंचायत व गणेश मंदिर या ठिकाणी गड नदी वरती…

Read More

कणकवली महापुरुष मंदिराचा ५ मार्चला वर्धापन दिन

रक्तदान शिबीर,विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम कणकवली ता.०१-:* कणकवली बाजारपेठ येथील महापुरुष मंदिराचा वर्धापन दिन ५ मार्चला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.या वर्धापन दिनाचे औचित्यसाधून सकाळी ९ वा. रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. यानिमित्त होणारे कार्यक्रम पहाटे ५ वा.काकड आरती,८ वा . श्रींच्या मूर्तीवर अभिषेक,१० वा . श्री सत्यनारायण महापूजा , दुपारी…

Read More

निलेश राणेंच्या सवलतीच्या दरातील फिल्टर, पीठ गिरणी दालनाचे उदघाटन

संजू परब यांच्या उपस्थितीत सतीश पाटणकर यांनी कापली फित सावंतवाडी ता.०१-:* सर्वसामान्य सिंधुदुर्ग वासीयांसाठी निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून फिल्टर व पीठ गिरणी ५० टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या रामेश्वर प्लाझा येथील दालनाचे उद्घाटन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यटन महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर यांच्या हस्ते फिट कापून उद्घाटन…

Read More

महाशिवरात्री निमित्त सालईवाडा हनुमान मंदिर येथून वैश्यवाडा पर्यंत भव्य मिरवणुकी

आमदार दीपक केसरकर यांची मिरवणुकीत उपस्थिती सावंतवाडी ता.०१-: शीला पूजन व दर्शन कार्यक्रमाचा आज महाशिवरात्रीच्या शुभ दिनी शुभारंभ करण्यात आला. यावेळी येथील सालईवाडा हनुमान मंदिर येथून वैश्यवाडा पर्यंत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने वैश्य बंधू-भगिनी सहभागी झाल्या होत्या. तर या मिरवणुकीत आमदार दीपक केसरकर यांनी सहभाग दर्शवला.

Read More

कणकवलीत चाळीस वर्षावरील खेळाडूंसाठी क्रिकेट स्पर्धा:मॉर्निंग क्रिकेट क्लबचे आयोजन

कणकवली ता.०१-:* मॉर्निंग क्रिकेट क्लब कणकवली (एम.एम.सी) यांच्या वतीने चाळीस वर्षावरील खेळाडूंसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. ही स्पर्धा 5 व 6 मार्च रोजी कणकवली विद्यामंदिरच्या मैदानावर होणार आहे. क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला 7,777 रु. व उपविजेत्या संघाल 5,555 रु. बक्षीस व चषक देण्यात येणार आहे. तसेच मॅन ऑफ दी सिरीज, उत्कृष्ट फलंदाज व…

Read More

“चेअरमन आपल्या दारी”या उपक्रमाला चांगला प्रतिसाद-भगवान लोके.

असलदे छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे कार्यक्रम उत्साहात कणकवली ता.०१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य गावांमध्ये सोसायटी निवडणूका अटीतटीच्या होत असताना माझ्या गावाने माझी निवड बिनविरोध केली.याबद्दल आपला मी ऋणी आहे,त्यामुळे शेतकरी व नागरिकांच्या हितासाठी”चेअरमन आपल्या दारी” हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. आतापर्यंत आम्ही गावातील सर्व वाडींमध्ये सभासदांपर्यंत पोहोचलो,सोसायटीच्या सभासद व कर्ज योजनांची माहिती दिली आहे. नागरिकांचा चांगला…

Read More

सावंतवाडी नगराध्यक्षासह विधानसभा आमदारही शिवसेनेचाच असणार

युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांचा दावा : सेनेचे कार्य पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली सावंतवाडी ता.२८-:* आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेवर लक्ष केंद्रित केल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असून, आगामी निवडणुकीत सावंतवाडी नगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार असल्याचा दावा युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांनी केला आहे. आमदार दीपक केसरकर यांनी विरोधकांच्या नाकावर टिच्चून…

Read More
You cannot copy content of this page