असलदे छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे कार्यक्रम उत्साहात
कणकवली ता.०१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य गावांमध्ये सोसायटी निवडणूका अटीतटीच्या होत असताना माझ्या गावाने माझी निवड बिनविरोध केली.याबद्दल आपला मी ऋणी आहे,त्यामुळे शेतकरी व नागरिकांच्या हितासाठी”चेअरमन आपल्या दारी” हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. आतापर्यंत आम्ही गावातील सर्व वाडींमध्ये सभासदांपर्यंत पोहोचलो,सोसायटीच्या सभासद व कर्ज योजनांची माहिती दिली आहे. नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे.आपण केलेल्या सत्काराने माझी आणखी जबाबदारी वाढली असल्याचे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना चेअरमन,पत्रकार भगवान लोके यांनी केले. असलदे छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे सालाबादप्रमणे श्री सत्यनारायण महापूजा त्यानिमित्ताने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, सोसायटी चेअरमन भगवान लोके, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर,सरपंच पंढरी वायंगणकर, माजी ग्रामपंचायत सदस्य मनोहर खोत,पत्रकार ऋषिकेश मोरजकर, सतीश पोकळे , सुनील लोके, सद्गुरू कुबल , कमलाकर महाडिक, लक्ष्मण कोरगावकर, श्रीराम मोरजकर,श्री महापुरुष दशावतार नाट्य मंडळ भाई शिर्के,कृष्णा वायंगणकर,बापू फोंडके,राजू देसाई,भाई मोरजकर, राजकुमार लोके, देविदास परब आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात” कृष्ण परतोनी येई गोकुळी ” या दशावतारी नाट्यप्रयोगाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला .यावेळी सोसायटी नुतन चेअरमन भगवान लोके यांचा जेष्ठ पत्रकार संतोष वायगंणकर यांच्या हस्ते,तर व्हाईस चेअरमन दयानंद हडकर यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच ग्रामीण पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल ऋषिकेश मोरजकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी पुरस्कृत केलेल्या ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत प्रथम विजेत्या वैशाली अमित सदडेकर,द्वितीय विजेत्या ज्योती राजेश देसाई,तृतीय विजेत्या स्नेहा बापू पोकळे या महिला विजेत्या ठरल्या आहेत.त्यांना आकर्षक पैठणी देत गौरविण्यात आले. श्री सत्यनारायण महापूजा, महाआरती, महाप्रसाद, हळदीकुंकू समारंभ , साळिस्ते भजन,रात्रौ महापुरूष दशावतार नाट्यमंडळ सावंतवाडी यांचा नाट्यप्रयोग ” कृष्ण परतोनी येई गोकुळी ” असे कार्यक्रम पार पडले.
