कणकवलीत चाळीस वर्षावरील खेळाडूंसाठी क्रिकेट स्पर्धा:मॉर्निंग क्रिकेट क्लबचे आयोजन

कणकवली ता.०१-:* मॉर्निंग क्रिकेट क्लब कणकवली (एम.एम.सी) यांच्या वतीने चाळीस वर्षावरील खेळाडूंसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. ही स्पर्धा 5 व 6 मार्च रोजी कणकवली विद्यामंदिरच्या मैदानावर होणार आहे. क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला 7,777 रु. व उपविजेत्या संघाल 5,555 रु. बक्षीस व चषक देण्यात येणार आहे. तसेच मॅन ऑफ दी सिरीज, उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यांना प्रत्येकी 1,111 रु. बक्षीस व चषक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेमध्ये जिल्हयातील प्रत्येक तालुक्याचा एक संघ खेळविण्यात येणार आहे व कणकवलीतील चार संघ खेळणार असून ही स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणार्‍या चाळीस वर्षावरील खेळाडूने आयडी कार्ड देणे बंधनकारक करणार आहे. सिंधुदुर्गात चाळीस वर्षावरील अनेक क्रिकेटपटू आहेत. यातील अनेक खेळाडू हे नोकरी, व्यवसायामुळे क्रिकेटच्या छंदापासून काहीसे दूर गेले आहेत. अशा खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावर उतरत त्यांच्यातील क्रिकेटची अंगभूत कला सादर करण्यासाठी हक्काची स्पर्धा असावी या उद्देशाने मॉर्निंग क्रिकेट क्लब गेली काही वर्ष ही स्पर्धा सातत्याने आयोजीत करत आली आहे. जिल्हयातील चाळीस वर्षावरील अनेक नामवंत क्रिकेटपटूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन अनिल हळदिवे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page