आमदार दीपक केसरकर यांची मिरवणुकीत उपस्थिती
सावंतवाडी ता.०१-: शीला पूजन व दर्शन कार्यक्रमाचा आज महाशिवरात्रीच्या शुभ दिनी शुभारंभ करण्यात आला. यावेळी येथील सालईवाडा हनुमान मंदिर येथून वैश्यवाडा पर्यंत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने वैश्य बंधू-भगिनी सहभागी झाल्या होत्या. तर या मिरवणुकीत आमदार दीपक केसरकर यांनी सहभाग दर्शवला.
