युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांचा दावा : सेनेचे कार्य पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली
सावंतवाडी ता.२८-:* आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेवर लक्ष केंद्रित केल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असून, आगामी निवडणुकीत सावंतवाडी नगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार असल्याचा दावा युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांनी केला आहे. आमदार दीपक केसरकर यांनी विरोधकांच्या नाकावर टिच्चून तीन वेळा आमदार झाले आहेत. त्यामुळे सावंतवाडी विधानसभेत भविष्यात देखील विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी देखील शिवसेनेचाच आमदार बसणार असल्याची ते म्हणाले आहेत.
यावेळी चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी सावंतवाडी नगरपालिकेवर बोलण्यापूर्वी ग्रामपंचायतीवर लक्ष केंद्रित करावे, अन्यथा ज्याप्रकारे नगरपरिषद मध्ये जसा पराभव झाला तसाच पराभव ग्रामपंचायत निवडणुकीत देखील होईल. असा टोला विशाल सावंत यांनी अमित परब यांना लगावला आहे.
