कणकवली ता.०१-:* कणकवली कॉलेज कणकवली राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचेमार्फत दत्तक गाव वागदे तालुका कणकवली याठिकाणी नुकतेच विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान जलसंधारण, ग्रामस्वच्छता व श्रमदान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जलसंधारणातून जल सुरक्षिततेकडे या उपक्रमांतर्गत वागदे ग्रामपंचायत हद्दी मध्ये गावठाणवाडी, दंगलवाडी, ग्रामपंचायत व गणेश मंदिर या ठिकाणी गड नदी वरती एकूण सहा वसुंधरा बंधारे बांधण्यात आले.
या जलसंधारण कार्यक्रमास वागदे ग्रामपंचायत सरपंच सौ. पूजा घाडीगावकर उपसरपंच रुपेश आमडोसकर, ललित घाडीगावकर, ग्रामसेवक प्रशांत वर्दम व वागदे ग्रामस्थ यांनी आवश्यक साहित्य देऊन सहकार्य केले. या शिबिरामध्ये करण्यात आलेल्या श्रमदाना मध्ये 130 विद्यार्थी सहभागी झाले. याव्यतिरिक्त श्रमदान कार्यक्रमात वागदे स्मशानभूमी, शाळा नंबर 1, शाळा नंबर 2 याठिकाणी स्वच्छता करण्यात आली. तसेच वागदे ते कासरल या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. शिबिराचे आयोजन प्रा. सुरेश पाटील प्रा. सागर गावडे प्रा. विनया रासम प्रा. आदिती मालपेकर व प्रा. प्रवीण कडुकर यांनी प्राचार्य डॉ राजेंद्र कुमार चौगुले आणि सर्व पदाधिकारी शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
