कणकवली महापुरुष मंदिराचा ५ मार्चला वर्धापन दिन

रक्तदान शिबीर,विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

कणकवली ता.०१-:* कणकवली बाजारपेठ येथील महापुरुष मंदिराचा वर्धापन दिन ५ मार्चला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.या वर्धापन दिनाचे औचित्यसाधून सकाळी ९ वा. रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.

यानिमित्त होणारे कार्यक्रम पहाटे ५ वा.काकड आरती,८ वा . श्रींच्या मूर्तीवर अभिषेक,१० वा . श्री सत्यनारायण महापूजा , दुपारी १२.३० वा.आरती,१ वा.पासून तीर्थप्रसाद तर ३ ते ५ भजनांचा भरगच्च कार्यक्रम सायं.५ वा.श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रसादिक भजन मंडळ असरोंडी यांचे दिंडीभजन , रात्री ७.३० वा.कै.बाबा कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा ‘काली हनुमंतेश्वरी महिमा’ नाट्यप्रयोग सादर होणार आहे.तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन महापुरुष मित्रमंडळ,बाजारपेठच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page