Headlines

Global Maharashtra Breaking News

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला सागर विश्रामगृहाच्या कामाचा शुभारंभ

वेंगुर्ला प्रतिनिधी- पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचे असलेल्या वेंगुर्ला येथील सागर विश्रामगृह या इमारतीची दुरुस्ती व मजबुतीकरण करणे या कामाचा शुभारंभ आज पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर त्यांनी नजिकच्या जलबांदेश्वर येथे करण्यात आलेल्या सुशोभिकरण विकासकामाचे उद्घाटनही केले. तसेच यालाच लागून असलेल्या व बांधकाम प्रक्रिया सुरु असलेल्या झुलत्या पुलाची पहाणीही केली. यावेळी खासदार…

Read More

आंबोली येथे महिला बचत गटांना दिले कापसा पासून फॅन्सी हार बनविण्याचे प्रशिक्षण

आंबोली ता.२८-:* आंबोली ग्रामपंचायत येथे १४ व्या वित्त आयोग उपजीविका अंतर्गत महिला बचत गटांना कापसा पासून फॅन्सी हार बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यावेळी सरपंच गजानन पालेकर, उपसरपंच दत्तू नार्वेकर, सदस्य शंकर चव्हाण, काशिराम राऊत, सारिका गावडे, सावित्री पालेकर, स्वप्निता कर्पे, साक्षी गावडे, तसेच प्रशिक्षक म्हणून उमा म्हाडदळकर आणि ग्रामविकास अधिकारी आर.एम.बहिरम हे उपस्थित होते

Read More

मालवण शहरातील प्रलंबित पर्यटन प्रकल्प मार्गी लावावेत

महेश जावकर यांची पर्यटन मंत्र्यांकडे मागणी मालवण ता.२८-:* मालवण शहरातील महत्वाचे पर्यटन प्रकल्प मार्गी लावण्यात लावून येथील पर्यटन विकासाला चालना द्यावी, अशी मागणी मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मालवण भेटीवर आलेल्या पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची महेश जावकर यांनी भेट घेत मालवणातील पर्यटन प्रकल्पांबाबतचे निवेदन सादर…

Read More

प्रांताधिकारी कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन

इंदिरा गांधी संकुलातील गाळे प्रकरण;नगरपालिकेवर रोष सावंतवाडी ता.२८-:* येथील सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयासमोर अमोल साटेलकर सह अन्य नागरिकांनी बोब मारो आंदोलन सुरू केले आहे. इंदिरा गांधी संकुलातील गाळे भाड्याने दिले मात्र गाळ्याचे भाडे करार संपला तरी अद्याप नुतनीकरण करण्यात न आल्याने नगरपालिकेचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत आहे.मात्र बाप्पा नार्वेकर संकुलातील गाळे नुतनीकरण व भाडेवाढ केली मग…

Read More

जिल्ह्यातील आठ ग्रामसेवकाना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

सीईओ प्रजित नायर यांनी केलं जाहीर सिंधुदुर्गनगरी ता २८-: जिल्ह्यातील आठ ग्रामसेवकांना आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. जि प प्रशासनाच्यावतीने जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आज हे पुरस्कार जाहीर केले . शासनाने ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करुन ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी सोडवण्यास सर्वतोपरी सहाय्य करण्याऱ्या…

Read More

ड्रीम इलेव्हन संघ विजेता

माऊली कला क्रीडा मंडळ सोनूर्ली देऊळवाडी आयोजित सोनूर्ली प्रीमिअर लीग २०२२ उत्साहात संपन्न सावंतवाडी ता.२८-:* माऊली कला क्रीडा मंडळ सोनुर्ली देऊळवाडी आयोजित सोनुर्ली प्रीमियर लीग २०२२ मध्ये ड्रीम इलेव्हन संघाने विजय संपादन करत चषकावर नाव कोरले. तर गिरोबा स्पोर्ट संघ उपविजेता ठरला. सोनुर्ली येथे चव्हाटा मैदानावर दोन दिवस चाललेल्या या या स्पर्धेत एकूण सहा संघाने…

Read More

शिक्षक भारती शाखा कणकवलीतर्फे मोफत नवोदय सराव परीक्षेचे आयोजन

कणकवली ता.२८-:* महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा कणकवलीच्यावतीने इयत्ता – पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत नवोदय सराव परीक्षेचे आयोजन बुधवार ६ एप्रिल २० २२रोजी सकाळी १० ते दुपारी १ या कालावधीत मारुती विद्यामंदिर केंद्रशाळा जानवली या ठिकाणी कणकवली तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेले आहे . तसेच सन 2021 मध्ये कणकवली तालुक्यातील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक…

Read More

जगभरातील पर्यटन कोकणात आणण्यासाठी प्रयत्नशील

कचरा निर्मूलन, पाणी पुरवठा, नेटवर्क कनेक्टीव्हीटी, पायाभूत सुविधा मजबूत करणार- पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे देवगड ता.२८-:* जगातील पर्यटन कोकणात आणू, यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. देवगडवासियांसाठी कचऱ्याचे निर्मूलनाबाबत आणि लवकरच पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे. संपूर्ण कोकणात प्रत्येक किलोमीटरला मोबाईल नेटवर्कची चांगली कनेक्टव्हीटी आणि पायाभूत सुविधा मजबूत करणार, अशी ग्वाही पर्यटन…

Read More

तारकर्ली येथील पुलाचे काम सुरू असल्याने वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा…

सार्वजनिक बांधकाम विभागाचे आवाहन… मालवण ता.२८-:* मालवण-वायरी-तारकर्ली-देवबाग मार्गावरील तारकर्ली येथील पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे. या पुलाचे काम सुरू असल्यामुळे अवजड वाहनांकरिता कुंभारमाठ–देवली या मार्गाचा वापर करावा व मालवणकडून येणाऱ्या चारचाकी हलक्या वाहनांकरिता भोगवेकर स्टॉप ते जुने दत्त मंदिर असा पर्यायी एक दिशा…

Read More

नववर्षानिमित्त मालवण मध्ये भव्य स्वरूपात निघणार नववर्ष स्वागत यात्रा…

मालवण ता.२८-: मालवण शहरामध्ये गेली १९ वर्षे गुढीपाडव्या निमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघत असून यावर्षी ही स्वागत यात्रा भव्य स्वरुपात करण्याचा संकल्प दत्त मंदिर भरड येथे झालेल्या नियोजन सभेत करण्यात आला. उद्योजक दीपक परब हे हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. हिंदू नववर्ष स्वागतयात्रा गुढी पाडव्याला २ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता…

Read More
You cannot copy content of this page