तारकर्ली येथील पुलाचे काम सुरू असल्याने वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा…

सार्वजनिक बांधकाम विभागाचे आवाहन…

मालवण ता.२८-:* मालवण-वायरी-तारकर्ली-देवबाग मार्गावरील तारकर्ली येथील पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे. या पुलाचे काम सुरू असल्यामुळे अवजड वाहनांकरिता कुंभारमाठ–देवली या मार्गाचा वापर करावा व मालवणकडून येणाऱ्या चारचाकी हलक्या वाहनांकरिता भोगवेकर स्टॉप ते जुने दत्त मंदिर असा पर्यायी एक दिशा मार्ग उपलब्ध आहे.

त्या मार्गाचा वापर करावा तसेच देवबागकडे जाण्याकरिता पुलाच्या बाजूला वळण मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page