ड्रीम इलेव्हन संघ विजेता

माऊली कला क्रीडा मंडळ सोनूर्ली देऊळवाडी आयोजित सोनूर्ली प्रीमिअर लीग २०२२ उत्साहात संपन्न

सावंतवाडी ता.२८-:* माऊली कला क्रीडा मंडळ सोनुर्ली देऊळवाडी आयोजित सोनुर्ली प्रीमियर लीग २०२२ मध्ये ड्रीम इलेव्हन संघाने विजय संपादन करत चषकावर नाव कोरले.

तर गिरोबा स्पोर्ट संघ उपविजेता ठरला. सोनुर्ली येथे चव्हाटा मैदानावर दोन दिवस चाललेल्या या या स्पर्धेत एकूण सहा संघाने सहभाग दर्शवला होता अत्यंत नियोजन पद्धतीने आयोजन करण्यात आलेल्या या स्पर्धेत दोन दिवसांमध्ये रोमांचक सामने पाहायला मिळाले दुसऱ्या दिवशी ड्रीम इलेव्हन संघ आणि गिरोबा स्पोर्ट संघामध्ये अंतिम सामना रंगला ड्रीम इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करत चार षटकांत गिरोबा संघाला तीस धावांचे उद्दिष्ट ठेवले उद्दिष्टांचा पाठलाग करताना गिरोबा संघाचे फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होऊन पराभव स्वीकारावा लागला.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 15 हजार तर द्वितीया तीय पारितोषिक बारा हजार रुपये ठेवण्यात आले होते बक्षीस वितरण समारंभ युवा सेनेचे पदाधिकारी तथा वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे निरवडे सामाजिक कार्यकर्ते संतोष गावडे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी स्पर्धेत सहभागी सर्व संघाना मंडळाच्यावतीने गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी कृष्णा गावकर यांच्यासह सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page