माजगावच्या नवनिर्वाचित सरपंच रंजना कानसे यांनी घेतली संजू परब यांची सदिच्छा भेट…
⚡सावंतवाडी ता.३०-: माजगाव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. रंजना रविंद्र कानसे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी संजू परब यांनी सरपंच कानसे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी रवींद्र कानसे तसेच सौ. संजना परब उपस्थित होते.
