⚡मालवण ता.२९-:
मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून वराड आणि धामापूर ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका सदस्य पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत वराड ग्रामपंचायतीमधून वर्षा प्रदीप मीठबावकर यांनी तर धामापूर ग्रामपंचायतीमधून आसावरी भोसले या विजयी ठरल्या.
मालवण येथील तहसील कार्यालयात आज सकाळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. चौके ग्रामपंचायत सरपंच म्हणून शिवप्रसाद चौकेकर यांनी विजय संपादन केला.
वराड ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या एका जागेसाठी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. येथे वर्षा मिठबावकर यांनी संजना चव्हाण यांचा अवघ्या ४ मतांच्या फरकाने पराभव केला. वर्षा मिठबावकर यांना २८४ मते (विजयी), संजना चव्हाण यांना २८० मते तर नोटा ७ मते पडली.
वराडमध्ये मीठबावकर यांच्या विजयाने जल्लोष
वराड ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४ मधून निवडून आलेल्या वर्षा प्रदीप मीठबावकर यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी अभिनंदन केले. यावेळी जि. प. चे वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर,भाई परब, नाथा रावले, राजन बोडवे, महेश चव्हाण, सुनील पोखरणकर, दादा वराडकर, अरुण गोसावी, आप्पा फाटक, ज्ञानेश्वर चव्हाण, सचिन फाटक, विनय मठकर, प्रवीण मिठबावकर, प्रदीप मिठबावकर, नंदन केसरकर, दत्तगुरु अटक, रामदास तारापूरे, ऋषिकेश परब, बापू साळगावकर, हर्षद मिठबावकर, प्रकाश घोगळे, लवू साळगावकर, पवन भिसे, बबन गोसावी, अरुण गोसावी, वर्षा मिठबावकर, प्राप्ती मीठबावकर, रुपेश भोगटे, रूपेश मिठबावकर आदी उपस्थित होते.
तसेच धामापूर ग्रामपंचायत मध्ये आसावरी भोसले यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेत विजय निश्चित केला. आसावरी भोसले यांना १५० मते (विजयी), जागृती भोळे यांना ७४ मते तर नोटा १ मत पडले.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडण्यासाठी तहसीलदार गणेश लव्हे, नायब तहसीलदार नीलिमा प्रभुदेसाई, निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर आणि सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांनी चोख कामगिरी बजावली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला.यावेळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
