रानबांबूळी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एक मधून सौ स्नेहल जांभवडेकर यांची बिनविरोध निवड…

⚡मालवण ता.२९-:
कुडाळ तालुक्यातील रानबांबूळी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यामधून ग्रामपंचायत सदस्या म्हणून रानबांबूळी येथील सौ. स्नेहल सुहास जांभवडेकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

रानबांबूळी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एक मधील (नामाप्र) यामध्ये ग्रामपंचायत सदस्य पदासाठी सौ. स्नेहल सुहास जांभवडेकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. हा उमेदवार अर्ज वैध ठरल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली होती. आज कुडाळ येथील तहसीलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सौ. सोनिया संतोष पालव यांनी सौ. स्नेहल जांभवडेकर या रानबांबूळी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एक मधून बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली. सौ. जांभवडेकर या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या सेवानिवृत्त बँक शाखाधिकारी आहेत.

या बिनविरोध निवडीनंतर बोलताना सौ. स्नेहल जांभवडेकर यांनी रानबांबूळी गावाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध राहणार असून गावातील सर्वसामान्य ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू, रानबांबूळी ग्रामस्थांनी जो आपल्यावर विश्वास व्यक्त केला आहे त्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानते असे सांगितले. त्यांच्या यां निवडीबद्दल जि. प. सदस्या सुप्रिया वालावलकर, सरपंच परशुराम परब
उपसरपंच सौ. अंजली कदम तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page