⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला शहरात अमली पदार्थांचा प्रादुर्भाव वाढला
असून विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. वेंगुर्ला शहरात कंपोस्ट डेपो नजिक एरियात, कॅम्प बीएसएनएल ऑफिस पाठीमागील एरियात, निमुसगा नजिक एरियात, धावडेश्वर नजिक एरियात वगैरे
शहरात एकूण सात ते आठ स्पॉट निर्माण झाले आहेत. अगदी आठवी इयत्तेपासूनची मुले, कॉलेज विद्यार्थी शहरात सायंकाळी अमली पदार्थांचा वापर करतात, गांजा ओढतात, ही बाब निश्चितच धोकादायक बनत चालली आहे. याबाबत आपण नगरपरिषद सभेमध्ये शासनाचे लक्ष वेधले आहे. त्याचप्रमाणे वेंगुर्ला पोलीस स्थानक, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना लवकरच निवेदन देणार आहे, अशी माहिती वेंगुर्ला नगरपरिषदचे युवा नगरसेवक प्रीतम उर्फ पिंट्या सावंत यांनी दिली.पालकांनी आपल्या पाल्ल्याकडे विशेष लक्ष पुरवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच याबाबत वेंगुर्ला सारख्या शांत शहरात अमली पदार्थ येतो कुठून, याबाबत माहिती घेऊन संबंधित यंत्रणेने सखोल चौकशी करावी व त्वरित लक्ष पुरवून कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.
वेंगुर्ला शहरात अमली पदार्थ मुळे विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात : नगरसेवक प्रीतम सावंत…
