शारदा पवार:आपत्तीत फोन रिसिव्ह न केल्यास घरी बसावे लागेल..
⚡वेंगुर्ला ता.२९-: जळगाव, धुळे आदी व अन्य ठिकाणी 48 ते 50 अंश सेलस्सीअस तापमान असते. कोकणात आज रोजी 41 अंश सेलसिअस तापमान आहे. ग्लोबल वोरमिंग परिस्थिती व हवामानाचा अंदाज पाहता कोकणात पावसाचे आगमन लवकर होऊ शकते. यासाठी सर्वांनी अलर्ट होऊन काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन दृष्टीने तसेच जनतेच्या जीविताच्या हिताच्या दृष्टीने काम होणे आवश्यक आहे. त्यासाठी
गावनिहाय
आपत्ती व्यवस्थापन आराखडे त्वरित बनवा, अशा सक्त सूचना प्रभारी प्रांताधिकारी शारदा पवार यांनी उपस्थित मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीसपाटील यांना दिल्या.
वेंगुर्ला तहसीलदार कार्यालय सभागृह येथे मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने प्रभारी प्रांताधिकारी शारदा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (29 एप्रिल ) सायंकाळी बैठक संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, नायब तहसीलदार राजन गवस व क्षितिजा जोशी,पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी आदी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी यांनीही विस्तृत मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याच्या सूचना केल्या. तसेच प्रत्येकाने आपल्या गावचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून सोमवारपर्यंत प्राप्त होणे आवश्यक असून सोमवारपर्यंत पाठवावेत, अशा सूचना केल्या. यावेळी 5 मंडळ अधिकारी, 22 तलाठी व पोलीसपाटील, वनविभाग अधिकारी सावळा कांबळे, आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे, पीडब्लूडी अधिकारी दिव्या जांभले, एमईसीबी अधिकारी श्री. पेटकर व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
