Global Maharashtra Breaking News

जिल्हा परिषदेच्या रांगोळी स्पर्धेत प्राची सावंत तर चित्रकला स्पर्धेत यश शिंदे प्रथम

जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन *⚡सिंधुदुर्गनगरी ता.३०-:* स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये रांगोळी स्पर्धेत 5 वी ते 7 वीच्या गटात जिल्हा परिषद शाळा पावशी मिटक्याचीवाडी शाळेच्या प्राची सदानंद सावंत हीने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर रांगोळी स्पर्धेमध्ये 5 वी ते 7 वीच्या…

Read More

जिल्हा बँकेसाठी सावंतवाडीत ९९.५२% मतदान

सावंतवाडी, ता.३०: सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी सावंतवाडी तालुक्यातील २१२ पैकी २११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९९.५२% इतके मतदान झाले. एक मतदार बाहेरगावी असल्यामुळे अनुपस्थित राहिला. एकूण २३ महिला आणि १८८ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. येथील तहसीलदार कार्यालयात सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरु असलेली ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान…

Read More

वैभववाडी-उंबर्डे रस्त्याचे काम निकृष्ट

वाहनचालक-प्रवाशानी केले रास्ता रोखो वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी – उंबर्डे मार्गावर सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने वाहनचालक व प्रवाशांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस घटनास्थळी दाखल होताच आंदोलन कर्त्यांनी काढता पाय घेतला. पोलिसांनी मार्ग वाहतूकीस पुर्ववत केला. कुसूर पिंपळवाडी नजीक डांबरीकरणाचे काम सुरू आहे. डांबर…

Read More

शैलजा पांढरे यांना ‘दिव्यांग नव साहित्यिक’ पुरस्कार

*⚡सावंतवाडी ता.३०-:* ऑनररी कॅप्टन आबा पाटील फाउंडेशन पुरस्कृत राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, शाखा सिंधुदुर्ग यांचा ‘दिव्यांग नव साहित्यिक’ हा जिल्हास्तरीय पुरस्कार ‘पुरस्कार आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमांतर्गत पुरस्कार विजेत्या शैलजा पांढरे यांना त्यांच्या घरी जाऊन प्रा. रुपेश पाटील व बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महासंघाचे जिल्हा सहसचिव लहू रगजी, जिल्हा सहखजिनदार वसंत…

Read More

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्याच्या घरासमोर केली भानामती

कणकवलीतील प्रकाराची जोरदार चर्चा कणकवली 30 डिसेंबर (प्रतिनिधी)- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण शिगेला पोचलेले असताना आता या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक कंगोरे देखील समोर येत आहेत. जिल्हा बॅंक निवडणुकी च्या मतदानाच्या आदल्या रात्री एका पदाधिकाऱ्याच्या घराच्या गेटसमोर कुवाळा, लिंबू, हळद, पिंजर असे देव देवस्कीचे प्रकार केल्याची ही बाब समोर आलीआहे रात्री उशिरा सदर पदाधिकारी घरी…

Read More

सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा होतोय दुरुपयोग

भाजपा नेते प्रमोद जठार, नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा आरोप *⚡कणकवली ता.३०-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक मतदान केंद्र कणकवली तहसीलदार कार्यालयात आहे.याठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांना सोडले जाते,उमेदवाराना मोबाईल दिले जात आहेत. सत्तेचा दुरुपयोग करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे पोलीस सत्ताधाऱ्यांना एक न्याय व आम्हाला दुसरा न्याय असे वर्तन करत असल्याचा आरोप भाजपा नेते प्रमोद जठार, जिल्हा परिषद…

Read More

सतीश सावंत यांना अटक करा

जि.प. अध्यक्ष संजना सावंत यांची पोलिसांकडे मागणी *⚡कणकवली ता.३०-:* जिल्हा बँक निवडणूक प्रसंगी कणकवली येथील केंद्रावर आक्षेपार्ह विधान व अपमानजनक वागणूक दिल्याप्रकरणी सहकार समृद्धी पॅनलचे उमेदवार सतीश सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी जि.प. अध्यक्ष संजना सावंत यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकारी कणकवली पोलिस स्टेशन येथे दाखल झाल्या.सतीश सावंत यांना अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात…

Read More

मालवण मध्ये ११० पैकी ९९ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क…

मालवण दि प्रतिनिधी सध्या गाजत असलेल्या आणि राणे कुटुंबियांसह महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या बनविलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीचे मतदान मालवणात शांततेत सुरू असून दुपारपर्यंत या बँकेच्या ११० मतदारांपैकी ९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मालवण तहसील कार्यालयात पार पडत असलेल्या या निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. या निवडणुकीत मालवणचे जिल्हा बँकेचे…

Read More

मनीष दळवी यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळला

उमेदवार असतानाही दळवी याना मतदानापासून रहावे लागणार वंचित *⚡ओरोस ता.३०-:* संतोष परब हल्ला प्रकरणी संशयित म्हणून पोलिसांच्या रडारवर असलेल्या असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील मनीष दळवी यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी नाकारला आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी काल झालेल्या सुनावणीत मनीष दळवी यांना यांचे नाव पुढे आले होते….

Read More

सतिश सावंत यांना तात्काळ अटक करा…

वैभववाडी भाजप महिलांची निवेदनाद्वारे पोलिसांकडे मागणी… *⚡वैभववाडी ता.३०-:* जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, प्रज्ञा ढवण आणि महिला सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असून, त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी वैभववाडी पोलिस निरीक्षक यांच्याकडे भाजप महिला संघटक यांनी केली आहे.

Read More
You cannot copy content of this page