सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील ५ ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामास मंजुरी…

रुपेश राऊळ; आमदार दीपक केसरकर यांनी केला पाठपुरावा

सावंतवाडी ता.१७-: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार कडून मान. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधणी योजनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ ग्रामपंचायत इमारत बांधणीला मंजुरी मिळाली आहे. त्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पाच ग्रामपंचायतींची इमारत बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांचा सतत पाठपुरावा होता, अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली.

माजी पालकमंत्री,आमदार दीपक केसरकर त्यांचा सततचा पाठपुरावा आणि खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील पाच ग्रामपंचायत इमारत बांधणीला मंजुरी मिळाली आहे असे श्री राऊळ म्हणाले.

सावंतवाडी तालुक्यात सातार्डा,ओवळीये , दोडामार्ग तालुक्यात मोरगाव व फुकेरी आणि वेंगुर्ला तालुक्यातील निवती येथे नवीन ग्रामपंचायत इमारत बांधणी योजनेतून मंजुरी मिळाली आहे. या नव्या ग्रामपंचायती एका वर्षात बांधकाम पूर्ण होऊन पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा शासनाने व्यक्त केली आहे. ग्रामपंचायत इमारत बांधणीला मंजुरी मिळाली आहे त्यासाठी माजी पालकमंत्री, आमदार दीपक केसरकर यांचा सततचा पाठपुरावा महत्त्वाचा आहे असे रूपेश राऊळ यांनी सांगितले.

You cannot copy content of this page