माथाडी व वीज कामगार सेना सरचिटणीस सुमंत तारी यांच्या माध्यमातून सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते करण्यात आले प्रदान
सावंतवाडी ता.१७-:* आज मनसे सावंतवाडी शहर मध्यवर्ती कार्यालयात डिंगणे ग्रा प सदस्य तथा मनसेचे डिंगणे शाखा अध्यक्ष श्री आदेश सावंत यांना त्यांच्या प्रभागा करिता सोलर लाइट्स देण्यात आले व तेथील जनतेची लाइट्स अभावी होणारी गैरसोय मनसेच्या माध्यमातून दूर करण्यात आली सदर सोलर लाइट्स हे मनसेचे माथाडी व वीज कामगार सेना सरचिटणीस सुमंत तारी यांच्याकडून आज मा आमदार तथा मनसे सरचिटणीस श्री परशुराम उपरकर यांच्या हस्ते ग्रा प सदस्य तथा शाखाध्यक्ष मनसे श्री आदेश सावंत यांना देण्यात आले.
श्री सावंत हे ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेच्या माध्यमातून गाव पॅनल मधून बिनविरोध निवडून आले होते. तसेच श्री सावंत यांनी मा आमदार उपरकर व श्री सुमंत तारी यांचे आभार मानले यावेळी मनसे सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार बांदा शहराध्यक्ष बाळा बहिरे संतोष भैरवकर उपतालुकाअध्यक्ष प्रकाश साटेलकर दोडामार्ग संपर्कअध्यक्ष अमोल देसाई संदेश शेट्ये निलेश इंदप दीपक गुराम विश्वनाथ राऊळ आदी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते
