काव्यसम्मेलनाच्या अध्यक्षा स्वप्नाली शेम्बडकर यांचे आवाहन
*⚡कणकवली ता.१७-:* सिंधुवैभव साहित्य कणकवली समूहातर्फे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 14 फेब्रुवारीला ऑनलाइन काव्यसम्मेलन पार पडले. ही पृथ्वी कामकरी व दलित लोकांच्या तळहातावर उभी आहे, या अण्णाभाऊ साठे यांच्या वचनाला स्मरून या सम्मेलनाचे अध्यक्षस्थान एक कामकरी महिला स्वप्नाली शेम्बडकर यांना देण्यात आले.
मोलकरीण हा घराचा एक महत्त्वाचा घटक. आम्ही तुमच्यासाठी राबतो. आमच्या कुटुंबाची काळजी घ्या, असे भावनिक आवाहन अध्यक्ष पदावरून स्वप्नाली शेम्बडकर यांनी केले. या सम्मेलनात कवी रिमा भोसले, मनीषा पाताडे, शैला कदम, सतीश चव्हाण, सुरेश पवार, सतीश पवार, मधुकर जाधव, सिंध्दार्थ तांबे, उदय सर्पे, आर्या इळकर, प्रगती पाताडे यांनी कवितेतून भीमस्तुती केली. मीनाक्षी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश घाडी, ओंकार चव्हाण, मनाली राणे, माधवी चव्हाण, हृतिक मेस्त्री यांनी परिश्रम घेतले.
