लिंगेश्वर सोसायटी वाघेरीच्या विजयी संचालक आणि ग्रामस्थांनी घेतली खास. राऊत यांची भेट

वाघेरी गावातील मुख्य रस्ता मंजूर करणार असल्याची दिली ग्वाही

कणकवली ता.१७-:* श्री लिंगेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, वाघेरी, ता.कणकवली च्या पंचवार्षिक निवडणूकीत शिवसेना- महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी उत्कर्ष पॅनेलने घवघवीत यश प्राप्त केले. भाजपने प्रतिष्ठित केलेल्या निवडणुकीत 12 पैकी 11 सभासद निवडून आले. या सर्व संचालकांनी आणि ग्रामस्थांनी युवासेना विभाग प्रमुख सिद्धेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांची त्यांच्या तळगाव येथील स्वगृही भेट घेतली. यावेळी सर्व विजयी संचालकांचा सत्कार खासदार साहेबांच्याहस्ते करण्यात आला.

या भेटी निमित्त शिवसेनेच्या माध्यमातून गावात केलेल्या विकासकामांना प्रोत्साहन दिल्याबद्दल ग्रामस्थांनी खासदारांचे आभार मानले. तसेच गावातील यापुढे आवश्यक असणाऱ्या कामांसाठी सहकार्य करण्यासाठी निवेदन दिले. यात गावातील मुख्य रस्ता (वाघेरी जोडरस्ता ग्रामा.- १०३), वाघेरी वाडी कडे जाणारा (वाघेरी कुळाचीवाडी जोडरस्ता ग्रामा.- १०५), लोरे सोनारवाडी ते वाघेरी वाडी उर्वरित रस्ता, देवधर मध्यम पाटबंधारे प्रकल्प अंतर्गत कालव्याचे काम पूर्ण करणे, तुतारी व मांडवी एक्स्प्रेसला नांदगाव रोड रेल्वे स्थानकावर थांबा मिळणे, गावातील नदीतील प्रदुषित गाळ उपसा करण्यासाठी निधी मंजूर करणे, देवधर पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या शिवगंगा नदीकाठी वसलेल्या वाघेरी वाडी येथे संरक्षण भिंत बांधणे इत्यादी कामांचा समावेश आहे.

यावेळी खासदार राऊत यांनी वाघेरी गावातील विकास कामे शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले. देवधर प्रकल्प संदर्भात जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक आयोजित करणे, रेल्वे बोर्डाशी प्रत्यक्ष भेट घेऊन गाडी थांबण्यासाठी प्रयत्न करणे यांसह प्रत्येक विकास कामांत प्रत्यक्ष लक्ष देण्याचे आश्वासन दिले. यावेळी विजयी संचालक श्रीकांत राणे, विश्राम राणे, मकरंद राणे, संतोष कदम, मुरलीधर राणे, सहदेव मोंडकर, गोपाळ कदम, पोलीस पाटील अनंत राणे, उपसरपंच तथा प्रभारी सरपंच अनुजा राणे, दिनेश राणे, आत्माराम राणे, अमोल गुरव, ना. गु. कदम, गजानन राणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page