कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. शिकलगार यांचा यंगस्टारने केला सत्कार

कणकवली ता.१७-:* गेल्या दोन वर्षांत कोविड काळात कणकवली तालुक्यासह उपजिल्हा रुग्णालया अंतर्गत रुग्णांना अत्युत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी. एम. शिकलगार यांचा यंगस्टार मित्र मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.

डॉ. शिकलगार हे गेल्या दोन वर्षात कोरोना काळात अहोरात्र रुग्णांना सेवा देण्यासाठी झटत होते. त्या काळातही ज्यावेळी काही खाजगी दवाखाने देखील बंद झाले. त्यावेळी डॉ. शिकलगार यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना अत्यंत चांगली सेवा देत खऱ्या अर्थाने सेवाभावी वृत्ती जोपासली. त्यांच्या या सर्व कामगिरीचा गौरव म्हणून यंगस्टार मित्र मंडळातर्फे त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला. यावेळी यंगस्टार मित्र मंडळाचे अध्यक्ष अण्णा कोदे, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भैय्या आळवे, पत्रकार रमेश जोगळे, तुषार हजारे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page