अभिनेते आनंद काळे, शिवकन्या अर्चना पार्टे यांनी केला प्रदान;सलग तीन वर्षे फोंडकर हापूस आंबा पेटी पाठवीत आहेत मार्केटमध्ये
मालवण दि प्रतिनिधी सलग तीन वर्षे हापूस आंब्याचे राज्यात प्रथम उत्पादन घेणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कुंभारमाठ येथील उत्तम फोंडेकर यांना महाराणी ताराबाई भोसले राष्ट्रीय विचार सामाजिक संमेलन कोल्हापूर यांच्यावतीने दिला जाणारा महाराणी ताराराणी स्वराज्य रत्न राष्ट्रीय गौरव पुरस्कार अभिनेते आनंद काळे आणि शिवकन्या अर्चना पार्टे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महाराणी ताराबाई भोसले राष्ट्रीय विचार सामाजिक संमेलन कोल्हापूर यांच्यामार्फत कला, क्रीडा, कृषी, सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणिक अशा विविधांगी क्षेत्रातील व्यक्तींना “महाराणी ताराराणी स्वराज्यरत्न राष्ट्रीय गौरव पुरस्कार” हा तीन वर्षांनी देण्यात येतो. यात मालवण कुंभारमाठचे उत्तम फोंडेकर यांची या जिल्ह्यातून प्रथमच तीन वर्षे आंबा पेटी पाठविल्याबद्दल या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार “माझी तुझी रेशीमगाठ”,”स्वराज्य रक्षक संभाजी” या मालिकेतील अभिनेते आनंद काळे तसेच शिवकन्या अर्चना पार्टे यांच्याहस्ते कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला. उत्तम फोंडकर यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल जिल्हा कृषी अधीक्षक सिद्धांना म्हेत्रे यांनी तसेच नागरिकांनी अभिनंदन केले आहे
