Global Maharashtra Breaking News

मराठी फलकाची अंमलबजावणी तात्काळ करावी

अन्यथा मनसेला कायदा हातात घ्यावा लागेल;शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांचे प्रांताधिकारी यांना निवेदन सावंतवाडी ता.१४-: येथील शहरासह तालुक्यात अनेक दुकानांचे फलक इंग्रजी भाषेतील असून राज्य शासनाच्या दुकानवरील नामफलक मराठीत या निर्णयाची तात्काळ व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी सर्व दुकाने निरीक्षकांना अमलबजावणी लवकरात लवकर करण्याबाबत उचित आदेश देण्यात यावेत अशी मागणी मनसे शहर अध्यक्ष आशिष…

Read More

जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे बांदा भाजप कडून सत्कार…

ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांनी दिल्या शुभेच्छा *⚡बांदा ता.१४-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाल्यानंतर बांदा भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला आहे. यावेळी बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा मराठा समाज अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा…

Read More

जुलै महिन्यातील अतिवृष्टी, पुरहानी नुकसानी बांदा, शेर्ले येथील बाधित वंचित

नुकसानी न मिळाल्यास २६ जानेवारीला तहसील कार्यालयात उपोषणाचा इशारा *⚡सावंतवाडी ता.१४-: सिंधुदुर्गात गेल्या वर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई बांदा आणि शेर्ले येथील नुकसानग्रस्त लोकांना अद्याप मिळाली नाही. येत्या आठ दिवसांत नुकसान भरपाई न मिळाल्यास 26 जानेवारीला तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याचा इशारा प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी वारंवार…

Read More

बुधवारी कुडाळचा आठवडा बाजार बंद ठेवणार

नितिन गाढवे यांची माहिती;निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी *⚡कुडाळ ता.१४-: निवडणुक निकालाच्या दिवशी वाहतुकीस अडथळा निर्णाण होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बुधवार १९ रोजीचा कुडाळचा आठवडा बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. याची सर्व व्यापारी, विक्रेते तसेच नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नितीन गाढवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे….

Read More

बांद्यात डंपर व कार यांच्यात समोरासमोर अपघात

सुदैवाने कोणीही जखमी नाही : वाहतूक सुरळीत सुरू *⚡बांदा ता.१४-:* मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु असल्याने सध्या वनवे वाहतूक सुरु आहे. दरम्यान, बांदा स्मशानभूमी नजीक हॉटेल कावेरी समोर डंपर व कार यांच्यात आज सकाळी समोरासमोर अपघात झाला. यात कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. डंपर चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा…

Read More

वेंगुर्ले पत्रकार समितीचे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

युवापिढी समोरील आव्हाने आणि संधी यावर दहावी ते महाविद्यालयीन गटाला सहभागाचे आवाहन *⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला तालुका पत्रकार समिती तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ‘युवापिढी समोरील आव्हाने आणि संधी‘ या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा दहावी ते महाविद्यालयीन गटामध्ये होणार असून यासाठी सुमारे ५०० ते ७०० शब्दमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. कोरोना…

Read More

शैक्षणिक दाखले मिळवून देण्याचे संदिप मेस्त्री यांनी गाठले शतक

सलग ११ वर्षे विनामूल्य सेवा; राजकारणातून साधले समाजकारण *⚡कणकवली ता.१४-: राजकारण हे केवळ माध्यम असून राजकारणातून समाजसेवा करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण कलमठ येथील संदीप मेस्त्री यांनी दाखवून दिले आहे. राजकारणात विविध पदे भूषवित असताना समाजकारण हाच राजकारणाचा पाया असल्याचे या निमित्ताने संदीप मेस्त्री यांनी दाखवून दिले आहे. सलग ११ वर्षे संदीप मेस्त्री निःस्वार्थीपणे विद्यार्थ्यांना…

Read More

फोंडाघाट सोसायटीमध्ये शासनातर्फे भात खरेदीचा शुभारंभ

कणकवली 13 जानेवारी (प्रतिनिधी)- फोंडाघाट विकास सेवा सोसायटी येथे चालू वर्षी शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या भाताच्या खरेदीचा शुभारंभ, चेअरमन राजन चिके यांनी वजन काट्याला पुष्पहार अर्पण करून, तर ज्येष्ठ नेते बबनमामा हळदिवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी हेमंत रावराणे, राजन नानचे, प्रसाद देसाई, विलास गुरव, विश्‍वनाथ जाधव, बंडु जाधव, नंदू जाधव सोनू कोकरे,गणेश इ….

Read More

ओसरगाव संस्थेच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे

तर उपाध्यक्षपदी प्रभाकर सावंत बिनविरोध *⚡कणकवली ता.१३-:* कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील श्री. लिंगमाऊली विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची पदाधिकारी निवड प्रक्रिया संस्थेच्या ओसरगाव येथील कार्यालयात पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी सदानंद सीताराम मोरे तर उपाध्यक्षपदी प्रभाकर धाकू सावंत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.ही निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी कृ. रा.धुळप यांच्या उपस्थितीत पार पडली….

Read More

अन्यथा मराठीत नसलेल्या नामफलकांवर काळे फासण्यात येईल

दुकान मालकांना मनसे दणका देईल;दया मेस्त्री यांचा इशारा *⚡कणकवली ता.१३-: ज्या दुकाने, आस्थापनांची नावे, पाट्या इतर भाषेत असल्यास मराठी भाषेत नसल्यास इतर भाषेत असणाऱ्या सर्व नामफलकांवर काळे फासण्यात येईल. असा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नावे मराठीत करण्यासाठी एक महिना कालावधी म्हणजेच 13 फेब्रुवारी 2022 पर्यंतची मुदत दिली जात असून…

Read More
You cannot copy content of this page