व्यापारी पतसंस्थेकडून उद्यमशील महिलांसाठी सुवर्णालंकार खरेदी कर्ज योजना

मालवण ता.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार उदिमात कार्यरत असणाऱ्या उद्यमशील महिलांना त्यांच्या आवडीचे सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी व्यापारी पतसंस्थेतर्फे महिलाप्रधान सुवर्णालंकार खरेदी कर्ज योजना अक्षय्य तृतियेपासून सुरू करण्यात, येत आहे. प्रायोगिक तत्वावर येत्या वटपौर्णिमेपर्यंत म्हणजे १४ जूनपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे.

या कर्ज योजनेंतर्गत फक्त व्यापारउदिम करणाऱ्या महिलांनाच दागिने खरेदीसाठी अधिकतम १ लाख रुपयांपर्यंतचा पतपुरवठा केला जाणार असून दागिन्यांची उर्वरित रक्कम ही त्यांनी संस्थेकडे भरणा करायची आहे. या योजनेत कुडाळ शहरातील लक्ष्मी ज्वेलर्स, मालवणमधील राजाराम बाबूराव नेरुरकर ज्वेलर्स, कणकवलीतील दीपक बेलवलकर ज्वेलर्स, तळेरे येथील एम. एस. पावसकर ज्वेलर्स, सावंतवाडी येथील अनंत नरहरी कारेकर ज्वेलर्स व वेंगुर्ले येथील मालवणकर ज्वेलर्स यांचा सहयोग असून या खरेदी सराफी पेढ्यां कडून सुरू केल्या जाणाऱ्या नव्या दागिन्यांसाठीच सध्या हा पतपुरवठा केला जाणार आहे. या बाबतच्या अधिक माहिती व अटी-शर्थी जाणून घेण्यासाठी व्यापारी पतसंस्थेचे व्यवस्थापक काका सावंत (९०४९८४५७३७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन वाळके व उपाध्यक्ष प्रकाश वाळके यांनी सर्व संचालक मंडळातर्फे केले आहे.

You cannot copy content of this page