एम्. क्रिकेट ॲकॅडमीचे आयोजन : 4 मे ते 10 मे पर्यंत रंगणार स्पर्धा
*⚡सावंतवाडी ता.०३-:* येथील एम् क्रिकेट अॅकॅडमीच्या वतीने १५ वर्षाखालील लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा मालवण बोर्डींग मैदानावर ४ मे ते १० मे पर्यंत होणार आहे .
या एम् क्रिकेट अॅकॅडमीच्या वतीने आयोजित १५ वर्षाखालील लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मालवण माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्या शुभहस्ते व माजी नगरसेवक दीपक पाटकर, बबन रेडकर, पप्पू परब, नंदू देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष उदय नाईक व उपाध्यक्ष अक्रम खान यांनी केले आहे.
