*⚡कणकवली ता.०३-:* सावंतवाडी विधानसभा मतदार संघ अध्यक्ष अर्चना घारे यांनी राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरसेवक अबिद नाईक यांना निवासस्थानी भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुडलिक दळवी, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे,माजी उपसभापती कुडाळ आर. के. सावंत,माजी सरपंच आकेरी संदीप राणे उपस्थित होते. यावेळी अर्चना घारे यांनी लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुकावार पक्ष बळकट करण्यासाठी नियोजन करण्यात येईल .त्यामध्ये आपण सर्वानी पक्ष बळकटीसाठी मदत करावी.
आपण राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक असून राष्ट्रवादीचे जुने पदाधिकारी आहात. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस उभारी घेणार आहे. त्याचे पाईक आपणच असणार आहोत असे म्हणत आज ईद निमित्त सौ. घारे यांनी नाईक यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस सुरेश गवस, प्रांतिक सदस्य उदय भोसले, गुरुदत्त कामत ,जिल्हा उपाध्यक्ष एम डी सावंत, सत्यजित धारणकर यांनी देखील अबिद नाईक यांना ईद निमित्त शुभेच्छा देऊन भविष्यात पक्षवाढीसाठी एकत्र काम करूया असे सांगितले.
