बुद्धिबळ स्पर्धांमध्ये मुक्ताई ॲकॅडमीच्या तीन विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी

कर्नाटक-हुबळी येथील सदगुरु चेसमार्ट्ज ॲकॅडमीचे आयोजन

सावंतवाडी ता.०३-:* कर्नाटक-हुबळी येथील सदगुरु चेसमार्ट्ज ॲकॅडमीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय “रॅपिड” व “ब्लिट्ज” या दोन बुद्धिबळ स्पर्धांमध्ये येथील मुक्ताई ॲकॅडमीच्या तीन विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पारीतोषिके मिळविली सतरा वर्षिय राष्ट्रीय खेळाडू कु. बाळकृष्ण पेडणेकर याने राष्ट्रीय रॅपिड बुदधिबळ स्पर्धेत नऊ राऊंड्समध्ये पाच विजय मिळवत आणि दोन राऊंड बरोबरीत सोडवत सहा पॉईंट्स मिळवले .

या स्पर्धेत बाळकृष्णने मुख्य गटात बाविसावा क्रमांक मिळवला ब्लिट्ज स्पर्धेत बाळकृष्णने मुख्य गटात तेराव्या क्रमांकाचे पारीतोषिक मिळवले बारा वर्षिय राष्ट्रीय खेळाडू कु. भावेश कुडतरकर याने तेरा वर्षांखालील गटात दहाव्या क्रमांकाचे पारीतोषिक मिळवले.

अॅकेडमीचा सर्वात लहान विदयार्थी सात वर्षिय राज्यस्तरीय खेळाडू कु. यश सावंत याला उत्तेजनार्थ पारीतोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुक्ताई अॅकेडमीचा गौरव करण्यात आला.विजेत्या विदयार्थ्यांना रोख पारीतोषिके, ट्रॉफी, मेडल आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत अठरा राज्यातील 303 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कर्नाटकचा पहीला ग्रँडमास्टर तेजुकुमार याचा सहभाग हे स्पर्धेचे विशेष आकर्षण होते

You cannot copy content of this page