प पु भालचंद्र महाराज पतसंस्था खारेपाटणतर्फे कामगारांचा सत्कार

कणकवली ता.०३-:* कणकवली तालुक्यातील प पु भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या पतसंस्थेच्यावतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामीण पातळीवर सेवा देणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विशेष सत्कार कार्यक्रम पतसंस्थेच्या कार्यलयात नुकताच सम्पन्न झाला. या कार्यक्रमाला पतसंस्थेच्या संचालिका सौ श्रद्धा विजय देसाई,सौ वर्षा विवेक ब्रम्हदंडे,पतसंस्थेचे ब्रँच मॅनेजर तथा मुख्यकार्य.अधिकारी शुभम मोरे,लिपिक सत्यवान खांडेकर, गणेश जामसंडेकर,रोहन होनाळे, अमर ढेकणे आदी मान्यवर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

खारेपाटण ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी श्री संदेश मधुकर पाटणकर यांचा यांचा संस्थेच्या संचालिका सौ श्रद्धा देसाई यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या बरोबरोच ग्रामपंचायतीच्या अन्य कर्मचाऱ्यांचा देखील संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.खारेपाटण पतसंस्थेच्या वतीने यापुढे दरवर्षी गुणवंत कामगारांचा १ मे कामगार दिनी सत्कार करण्यात येणार असल्याचे संस्थेचे सचिव श्री शुभम मोरे यांनी यावेळी सांगितले. खारेपाटण संस्थेने केलेल्या सन्मानाबद्दल खारेपाटण ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाने समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page