कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा नर्सरी व्यावसायिक शेतकरी संघटनेचा पुढाकार
सावंतवाडी ता.०३-:* “कृषी विकास प्रतिष्ठान” अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा नर्सरी व्यवसायिक शेतकरी संचालित “कोकण नर्सरी” (उषा कंस्ट्रक्शन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंचायत समिती जवळ, तेली आळी,) कणकवली या ठिकाणी कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार दिनांक 3 एप्रिल 2022 रोजी अक्षय तृतीया च्या शुभमुहूर्तावर सायंकाळी 4 वाजता होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट व नर्सरी व्यवसायिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक श्री बाळासाहेब सावंत, जिल्हाध्यक्ष श्री सत्यवान चव्हाण, श्री महेश दाभोळकर, श्री दिनेश मेस्त्री, श्री पंढरी चव्हाण, श्री कमलाकर कदम यांनी यांनी केले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट व नर्सरी व्यवसायिक यांना “कोकण नर्सरी” च्या माध्यमातून शेतकऱ्यांना संघटित करून नवीन व्यवसाय व रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होणार आहे
