Headlines

Global Maharashtra Breaking News

येणारी जिल्हा परिषद नारायण राणे यांचीच असेल

फोंडाघाट ग्रामपंचायत भवनचे आम. नितेश राणे यांच्याहस्ते लोकार्पण कणकवली ता.०१-:* विरोधक शिवसेनानेते टोल नको म्हणून आंदोलन करतात. त्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आधिच स्थगिती दिली. उद्या सेनेवाले नवीन गाड्यांमधून फिरताना दिसतील त्यावेळी समजावे टोल आंदोलन यशस्वी झाले.त्यामुळे विकासकामे व विकास करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.येणारी जिल्हा परिषद नारायण राणे यांची असेल, त्यासाठी सर्वांनी कटिबद्ध…

Read More

सौ. अनुष्का चव्हाण यांना गुरू गौरव पुरस्कार प्रदान

मालवण ता.०१-:* बिळवस माध्यमिक विद्यालयाच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. अनुष्का नागेश कदम यांना राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था, उस्मानाबाद यांच्यामार्फत देण्यात येणारा गुरू गौरव राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार बीड येथे प्रदान करण्यात आला. सौ. कदम या दरवर्षी नवोपक्रम कृती संशोधन आदी उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होत असतात. जिल्हास्तरावर इंग्रजी विषयाच्या तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करतात. या सर्वांची…

Read More

आंबा बागायतदार व्यापारी संघास सिंधुरत्न योजनेत समाविष्ट करून घ्या…

आंबा व्यवसायिक बागायतदार यांची आमदार दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी मालवण ता.०१-:* आंबा बागायतदारांच्या उन्नतीसाठी आंबा बागायतदार- व्यापारी संघास सिंधुरत्न योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघाने सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आम. दीपक केसरकर यांच्याकडे निवेदन सादर करून केली आहे. मालवण दौऱ्यावर आलेल्या आम. दीपक केसरकर यांची आंबा व्यावसायिक संघांच्या पदाधिकाऱ्यांनी…

Read More

शासकीय रेखाकला परीक्षेत वराडकर हायस्कूलचे सुयश

मालवण ता.०१-:* शासकीय रेखाकला परीक्षेत कट्टा येथील वराडकर हायस्कूलने घवघवीत यश मिळवले आहे. यात वराडकर हायस्कुलचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला असून एकूण १२ विद्यार्थ्यांनी अ श्रेणी प्राप्त केली आहे. एलिमेंटरी परीक्षेत २५ विद्यार्थी प्रविष्ट होऊन सर्व उत्तीर्ण झाले. त्यामुळे या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून विभास महेश माधव,…

Read More

देवगड आगारातील वाहक स्वप्नील जोशी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन…

देवगड ता.०१-: देवगड आगारातील वाहक सेवेत असलेले कर्मचारी स्वप्नील सखाराम जोशी (वय ३३) यांचे रापम वाहक सेवा बजावीत असताना आकस्मिक हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांच्या आकस्मिक निधनाने एसटी कामगारांत हळहळ व्यक्त होत आहे. देवगड आगारात अत्यंत मनमिळावू व शांत हुशार प्रवासी वर्गाशी सौजन्यपूर्ण वागणूक देणारे वाहक म्हणून ते परिचित होते. देवगड आगारात गेली ११…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा…

सीताराम गावडे; अन्यथा कदंबा बसेस सावंतवाडीत येऊ देणार नाही *⚡सावंतवाडी ता.०१-:* चंदगड कोल्हापूर मधील पर्यटकांना म्हापसा गोवा येथे लुबाडून त्याने आपला पत्ता महाराष्ट्र असे सांगताच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमान कारक बोलून त्या युवकांना बेदम चोपले, छत्रपतींचे नाव घेऊन राज्य व देशाचा कारभार करणाऱ्या सरकारने याबाबत कठोर कारवाई करावी, अन्यथा छत्रपतींचे मावळे अशा भेकड वृत्तीला सडेतोड…

Read More

नगर वाचन मंदिरतर्फे शिवगीत गायन-पोवाडा स्पर्धा

*⚡मालवण ता.०१-:* महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे मालवण येथील नगर वाचन मंदिरतर्फे ६ जून रोजी शिवगीत गायन व पोवाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता पहिल्या सत्रात शिवगीत गायन स्पर्धा होईल .यात गट पहिला-सहावी ते दहावी व त्यानंतर गट दुसरा खुल्या गटात ही स्पर्धा होईल. दुपारी…

Read More

प्रशासकीय अनास्थेमुळेच जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय उध्वस्त – बाबा मोंडकर

मालवण ता.०१-:* एका बोट दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील सागरी पर्यटन पूर्णपणे बंद ठेवण्याचा घाट स्थानिक प्रशासनाने घातला आहे. प्रशासकीय अनास्थेमुळेच जिल्ह्यात तेजीत चाललेला पर्यटन व्यवसाय उध्वस्त झाला असून याचं मानसिकतेमुळे स्थानिक भूमिपुत्र अनधिकृत जलक्रीडा व्यवसाय करण्यास मजबूर आहेत, अशी टीका जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय हा पूर्ण पणे…

Read More

स्वतःची प्रॉपर्टी विकसित करण्यासाठी शासनाच्या निधीवर डल्ला

आम.वैभव नाईक यांच्यावर भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांचा आरोप कणकवली ता.०१-:* एकीकडे जनतेच्या विकासासाठी निधी नाही आणि दुसरीकडे मात्र आमदार वैभव नाईक शासकीय निधीतून स्वतःच्या मालमत्तेचा विकास करत आहेत ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे.आमदार असतानाही स्वतःची प्रॉपर्टी विकसित करण्यासाठी शासनाच्या निधीवर आम.वैभव नाईक हे डल्ला मारत असल्याचे हे सिद्ध झाले आहे . याबाबत आम्ही राज्याचे…

Read More

शिवार बैठकांच्या माध्यमातून विविध योजना पोहचवा-शैलेंद्र दळवी

वेंगुर्ला ता.०१-:* मोदी सरकारने सत्तेवर आल्या-आल्या विविध कल्याणकारी योजनांचा झपाट्याने प्रारंभ केला. या योजना प्रामुख्याने गोरगरीब, महिला, मध्यम वर्ग, छोटे शेतकरी, कामगार, मजुर, कष्टकरी वर्गाला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आल्या. या योजनांचे लाभ थेट गरजू वर्गापर्यंत पोहचवण्यासाठी मोदी सरकारने थेट हस्तांतरण प्रक्रिया पद्धतशीरपणे कार्यान्वीत केली. त्यामुळे थेट लाभाच्या योजनेचा पैसा गोरगरिबांच्या खात्यात जमा झाला. अशा…

Read More
You cannot copy content of this page