शासकीय रेखाकला परीक्षेत वराडकर हायस्कूलचे सुयश

मालवण ता.०१-:* शासकीय रेखाकला परीक्षेत कट्टा येथील वराडकर हायस्कूलने घवघवीत यश मिळवले आहे. यात वराडकर हायस्कुलचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला असून एकूण १२ विद्यार्थ्यांनी अ श्रेणी प्राप्त केली आहे. एलिमेंटरी परीक्षेत २५ विद्यार्थी प्रविष्ट होऊन सर्व उत्तीर्ण झाले. त्यामुळे या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून विभास महेश माधव, सिद्धली लक्ष्‍मण पांचाळ, लाजरी गणेश राणे, सई विनय ताम्हणकर, मयूर अभय दळवी, पूर्वा विजय चव्हाण या विद्यार्थ्यांनी अ श्रेणी प्राप्त केली.

तसेच चैताली सचिन गावडे, मनाली महेश पाडावे, वैभवी सुनील बागवे, सिद्धी रामचंद्र जांभवडेकर, निधी राजन गावडे ,इशा श्रीकृष्ण तेली, सानिया अनिल कुडतरकर, मलिक्षा देवेंद्र लोहार या विद्यार्थिनी “ब” श्रेणी प्राप्त केली. इंटरमिजिएट परीक्षेसाठी २८ विद्यार्थि प्रविष्ट होऊन सर्व उत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून यश संजय साळुंखे, मयूर सतीश नांदोसकर, मिथिल महेश आंगचेकर, शुभम शैलेंद्र शंकरदास, प्रतीक्षा नीळकंठ मेस्त्री, सुरज राजन नांदोसकर या विद्यार्थ्यानी अ श्रेणी प्राप्त केली. तर गौरव सत्यविकास गावडे, आर्यन जयेश मोरजकर ,मयुरेश उदयभानु चिंदरकर, दर्पण गुरुनाथ वालावलकर, ओमकार महेश पाटकर, ओम संतोष पार्टे, श्रद्धा उदयभानू चिंदरकर, विराज भरत पवार, श्रावणी आनंद फाले, गौरव किशोर फणसेकर, अजिंक्य सत्यवान चव्हाण, सार्थक सुभाष कदम ,शार्दुल सचिन तारापुरे, दक्षता दिनेश पाडावे, प्राची प्रसाद मेस्त्री विद्यार्थ्यांनी ब श्रेणी प्राप्त केली. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक समीर चांदरकर तसेच सहाय्यक शिक्षक भूषण गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था विश्वस्त ऍड. एस.एस. पवार, डाॅ.व्ही.सी. वराडकर, सल्लागार कर्नल शिवानंद वराडकर, अध्यक्ष अजयराज वराडकर ,उपाध्यक्ष आनंद वराडकर, प्रशांत टेंबूलकर, सचिव सुनिल नाईक व श्रीमती विजयश्री देसाई, सहसचिव मंदार वराडकर, खजिनदार रविंद्रनाथ पावसकर, सर्व संचालक वर्ग, शालेय समिती अध्यक्ष सुधिर वराडकर, प्रभारी मुख्याध्यापक एस. एस .नाईक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page