देवगड आगारातील वाहक स्वप्नील जोशी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन…

देवगड ता.०१-: देवगड आगारातील वाहक सेवेत असलेले कर्मचारी स्वप्नील सखाराम जोशी (वय ३३) यांचे रापम वाहक सेवा बजावीत असताना आकस्मिक हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांच्या आकस्मिक निधनाने एसटी कामगारांत हळहळ व्यक्त होत आहे.

देवगड आगारात अत्यंत मनमिळावू व शांत हुशार प्रवासी वर्गाशी सौजन्यपूर्ण वागणूक देणारे वाहक म्हणून ते परिचित होते. देवगड आगारात गेली ११ वर्षे हुन अधिक काळ वाहक सेवेत असलेले स्वप्नील जोशी हे देवगड बेळगाव (स.७.१५)ची वस्तीची फेरी बेळगाव येथे पोहचले नंतर ते गाडीत आराम करीत असताना त्यांच्या छातीत दुखू लागले व त्यात त्यांना हृदयविकाराचा झटका येतून त्यात त्यांचा मृत्यू झाला.असे समजते.मूळचे गारगोटी येथील श्री जोशी कुटुंबीय आई वडील समवेत देवगड येथे रहात होते .स्वप्नील जोशी यांचे पश्चात आई, वडील ,पत्नी व ३ वर्षाची एक मुलगी असा परिवार आहे.बेळगाव येथून त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करून त्यांच्या मूळगावी गारगोटी येथे नेण्यात आला असून देवगड आगाराचे आगार व्यवस्थापक श्रीकांत सैतवडेकर व अन्य कर्मचारी त्यांच्या मूळगावी रवाना झाले आहेत.

देवगड आगारातील अधिकारी व कर्मचारी वर्गामार्फत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. फोटो -वाहक स्वप्नील जोशी

You cannot copy content of this page