नगर वाचन मंदिरतर्फे शिवगीत गायन-पोवाडा स्पर्धा

*⚡मालवण ता.०१-:* महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे मालवण येथील नगर वाचन मंदिरतर्फे ६ जून रोजी शिवगीत गायन व पोवाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता पहिल्या सत्रात शिवगीत गायन स्पर्धा होईल

.यात गट पहिला-सहावी ते दहावी व त्यानंतर गट दुसरा खुल्या गटात ही स्पर्धा होईल. दुपारी ३.३० वाजता दुसऱ्या सत्रात गट पहिला सहावी ते दहावी व त्यानंतर गट दुसरा खुल्या गटात पोवाडा स्पर्धा होईल. दोन्ही गटातील स्पर्धकांनी आपली नावे ५ जून रोजी दुपारी १२ पर्यंत नगर वाचन मंदिर, मालवण येथे आणून द्यावीत. प्रथम तीन विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके व प्रशस्तीपत्रके देण्यात येणार आहेत. प्रत्येक गटाच्या स्पर्धा समाप्तीनंतर पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उदयराव भोरे व नागेश कदम यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ग्रंथपाल संजय शिंदे (९४२२२३४९५०), श्रेया चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page