मडुऱ्यातील मिरचीला कुडपा रोगाचा प्रादुर्भाव
बांदा ता.२४-:* अवकाळी पावसाचा परिणाम मिरची उत्पादनावर झाला असून मडुऱ्यात मिरचीच्या रोपांना कुडपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अनेक फवारणी करून सुद्धा रोग कमी होत नसून शेतकरी हवालदिल झाला आहे . त्यात योग्यप्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी कोणताही कृषी अधिकारी येत नसल्याचे सांगत मिरची उत्पादकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. तसेच जर मिरचीचे नुकसान झाल्यास तीच रोपे तालुका कृषी…
