बांदा /प्रतिनिधी
येथील नट वाचनालय ग्रंथालयाच्यावतीने लोककल्याणकारी राज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून वाचनालयात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा हा दिवस सर्वत्र साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डिंगणे येथील एकनाथ सावंत हेउपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, संचालक जगन्नाथ सातोस्कर, महिला सदस्या स्वप्निता सावंत उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ऐतिहासिक पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. यावेळी एकनाथ सावंत तसेच प्रकाश पाणदरे, अनंत भाटे, सुभाष मोर्ये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व त्यांचा राज्याभिषेक सोहळा याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. पुस्तकांच्या मांडलेल्या प्रदर्शनाचा सर्व वाचक व सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री मोर्ये यांनी यावेळी केले. यावेळी अंकुश माजगांवकर, रामचंद्र पेंडसे, विट्ठल रेळेकर, ग्रंथपाल प्रमिला मोरजकर -नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, अमिता परब आदी उपस्थित होते.
फोटो :-
बांदा नट वाचनालयात शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे दीपाप्रज्वलन करताना एकनाथ सावंत. सोबत सुभाष मोर्ये व इतर. (छायाचित्र – निलेश मोरजकर)