अधिकृत रोपवाटिका मालकाची कृषी जिल्हा अधीक्षक यांच्याकडे मागणी
बांदा/प्रतिनिधी
अधिकृत परवाना नसताना देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कलमे व रोपे विक्री होत असल्याने याचा त्रास परवानाधारक रोपवाटिकाना होत आहे. अशा चालकांवर तात्काळ कारवाई करावी यासह अनेक मागण्यांचे निवेदन परवाना धारक नर्सरी मालकांच्या वतीने कृषी जिल्हा अधीक्षक यांना देण्यात आले. यावेळी तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन कृषी विभागाकडून देण्यात आले.
. निवेदनात म्हटले आहे कि, जिल्ह्यातील अधिकृत रोपवाटिका धारकांची जिल्ह्याबाहेरील पथकद्वारे तपासणी करून नाहक देण्यात येणारा त्रास बंद करावा. जिल्ह्यातील रोपवाटिका परवान्याची मुदत पूर्वीप्रमाणे ५ वर्ष करण्यात यावी. बेकायदा कलम विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी. दोन किंवा ३ वर्षांची कलमे गुणवत्तानुसार वाढीव रकमेस विकण्यास परवानगी मिळावी. नोंदवह्यांची यादी आराखडा सोपा करून सुटसिटीत करावा जेणेकरून सर्वसामान्य रोपवाटिका धारकांना सोपे जाईल अशा मागण्यात करण्यात आल्या.
यावेळी जिल्हा कृषी अधिकऱ्यांची चर्चा देखील करण्यात आली. मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी विश्वास वेलणकर, अर्जुन मोरजकर, पांडुरंग पालव, आदर्श मोरजकर, महादेव होडावडेकर, विकास म्हाडगूत, दीपक आंगणे, हेमंत सावंत, मंगेश गावडे, सुभाष गावडे, शशिकांत मुळीक, सच्चीदानंद परब, रवींद्र गुरव, रामकृष्ण गुरव, शिवाजी गुरव, नंदकिशोर गावडे, राजेश शिरोडकर, प्रभाकर सरवटे आदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परवाना धारक रोपवाटिका मालक उपस्थित होते.
फोटो :-
ओरोस येथे जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देताना परवाना धारक रोपवाटिका मालक. (छायाचित्र – निलेश मोरजकर )